Goa Election: तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढविणार

राज्यातून भाजप सरकार (BJP government) हटविणे हाच निवडणुकीत मुख्य मुद्दा असणार आहे.
Goa Election: तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढविणार
तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) सर्व म्हणजेच 40 मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.Dainik Gomantak

पणजी: तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) सर्व म्हणजेच 40 मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. राज्यातून भाजप (BJP) सरकार हटविणे हाच निवडणुकीत मुख्य मुद्दा असणार आहे. अशी माहिती गोवा तृणमूल काँग्रसचे नेते लुईझिन फालेरो (Luisin Falero) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) सर्व म्हणजेच 40 मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.
फालेरो ममता बॅनर्जींची भेट घेऊन गोव्याला परतले

फालेरो म्हणाले, तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता गोव्यात चळवळ सुरु करणार आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस तर्फे चाळीसही मतदार संघात निवडणूक लढविणार असून लोकांना पाहिजे असलेल्या उमेदवार प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीत उतरवून या चळवळीला सुरुवात करण्यात येईल असे फोलेरो यांनी स्पष्ट केले.तसेच सर्व प्रथम बेरोजगारी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) सर्व म्हणजेच 40 मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.
जरा थांबा, आणखी लोक तृणमूल काँग्रेस पक्षात येतील: फालेरो

आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी अखेर त्यांनी कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच लुईझिन फालेरो यांच्यासह अन्य 10 जणांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आज ते गोव्यात परतले. सोमवारी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी आपल्या टीएमसी प्रवेशाबाबत कमालीचा सस्पेन्स कायम ठेवला होता. अखेर त्यांनी कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लुईझिन फालेरो यांच्यासह अन्य 10 जणांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com