Breaking : निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी गोव्याचे नवे लोकायुक्त

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी आज दोनापावल येथील राज भवनमध्ये गोवा लोकायुक्त पदाची शपथ घेतली. त्यांना गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही शपथ दिली.

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी (Ambadas Joshi)  यांनी आज दोनापावल येथील राज भवनमध्ये गोवा लोकायुक्त ( Goa Lokayukta)  पदाची शपथ घेतली. त्यांना गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित होते. आज सकाळी ११ वा. राज्यपालांकडून त्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम होणार आहे. (Retired Justice Ambadas Joshi appointed as Goa Lokayukta)

GOA COVID-19: गोवा देशात 'टॉप'ला; ग्रामीण भागात कोरोनाचा कहर

राज्याचे माजी लोकायुक्त एम. के. मिश्रा हे 2019  मध्ये सप्टेंबर महिन्यात निवृत्त झाले होते.  त्यांनी निवृत्तीपूर्वी काही तक्रारींबाबत दिलेले आदेश सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढणारे होते. त्यानंतर लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती करत  त्यामुळे सरकारने त्यामधील काही अधिकारच शिथिल केले. निवृत्त मुख्य न्यायमूर्तीच्या जागी निवृत्त न्यायमूर्तीची लोकायुक्तपदासाठी निवड करण्यास मंजुरी दिली होती व काही अधिकारही शिथिल केले होते. त्यामुळे काँग्रेसने विधानसभेत  या दुरुस्तीला  विधेयकाला विरोध केला.  तत्कालीन लोकायुक्त एम. के. मिश्रा हे सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार  असल्याची कल्पना असूनही कोणतेही आवश्यक पावले उचलली गेली नाहीत,  यासंदर्भात ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हे रिक्त पद भरण्यासाठी सरकारला मुदत दिली होती. मात्र कोविड महामारीचे कारण पुढे करून चालढकलपणा सुरू ठेवला होता.

वाचा : कोण आहेत अंबादास जोशी
निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी मुंबईतून बीएससी, एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर 1979 पासून ठाण्यात वकिली सुरु केली.
1993  मध्ये त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती  करण्यात आली.  तर 20 ऑगस्ट 1993 मध्ये सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पदावर कार्यरत होते.   
अंबादास जोशी  1996  ते 2000 या पाच वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पदाची भूमिका पार पाडली. 
2000  ते 2005 मध्ये  ते केंद्रीय गुप्तचर विभागाच्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश म्हणून काम पहिले. 
2005  ते 2006 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक होते. 2007 ते 2009  मध्ये रत्नागिरीत प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश होते. 
त्यानंतर 2015   पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. 

संबंधित बातम्या