ब्रेकिंग : गोव्यात पूढील 5 दिवस कडक लॉकडाऊन 

दैनिक गोमंतक
बुधवार, 28 एप्रिल 2021

गोवा : राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने राज्यात पुढील 5 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सायंकाळी 5 वाजल्यापासून हे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

गोवा : राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने राज्यात पुढील 5 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सायंकाळी 5 वाजल्यापासून हे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूकसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर उद्योगधंदे मात्र चालू राहणार असल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.  लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. किराणामालाची सर्व दुकाने दिवसभर खुली राहणार आहेत. कसिनो, बार बंद राहतील. असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.  याशिवाय कोणत्या सेवा सुरू राहतील व बंद रात्री याविषयीची मार्गदर्शक सूचना आज सायंकाळी उशिरापर्यंत जारी केली जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पत्रकारांशी बोलताना या टाळेबंदीची घोषणा केली आहे. (Breaking: Strict lockdown in Goa for next 5 days) 

औद्योगिक आस्थापनांना साठी ही टाळेबंदी लागून असेल आणि सर्व कारखाने उद्योग या टाळेबंदी च्या काळात सुरू राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. टाळेबंदी च्या काळात सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक समारंभांवर बंदी असेल असे सूचित केले जात आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढतच आहे. तसेच मंगळवारी कोरोनामुळे 31  जणांचा मृत्‍यू झाला, तर 2110 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण सापडले. सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडले. गेल्या तीन दिवसांत 6824 कोरोना बाधित सापडले, तर तब्‍बल 93  जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. विरोधकांनी सरकारवर असंवेदनशील झाल्याचा आरोप केला आहे.  ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

 

संबंधित बातम्या