Breast Cancer Awareness: वाळपईत स्तन कर्करोग विषयक जागृती

चिंबल येथील युवराज फाउंडेशनच्या डाॅ. श्रृती गावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Breast Cancer Awareness Program
Breast Cancer Awareness ProgramDainik Gomantak

Breast Cancer Awareness Program: येथील उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्तन कर्करोग तपासणी शिबिर व जनजागृती कार्यक्रमात चिंबल येथील युवराज फाउंडेशनच्या डाॅ. श्रृती गावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर डाॅ. प्रतिक्षा सक्सेना, प्राचार्य रियाज जमादार, पत्रकार सपना सामंत, शिक्षिका स्नेहप्रभा वेलिंगकर, प्रज्ञा मयेकर उपस्थित होते.

डाॅ. प्रतिक्षा यांनी सांगितले की येणाऱ्या दिवसात आरोग्य खात्यातर्फे अशा प्रकारचे शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा, तसेच वेळोवेळी आपले आरोग्य तपासणी केली पाहिजे.

मान्यवरांच्या हस्ते मुलांनी तयार केलेल्या खास भीतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. सुरुवातीस स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. स्नेहा वेलिंगकर यांनी स्वागत केले. यावेळी एकूण 50 महिलांनी स्तन तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रज्ञा मयेकर, दीपाली सावंत, स्नेहप्रभा वेलिंगकर यांनी हातभार लावला.अक्षता गावकर, दिव्या गावडे, प्राजक्ता पर्येकर, महिमा म्हावळींगकर, गौतमी गावस यांनी स्वागत गीत म्हटले.

कर्करोगचे वाढते प्रमाण-

दिवसेंदिवस कर्करोग वेगाने वाढतो आहे. केमोथेरपीच्या आणि रेडिओथेरपीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करतो. ट्युमरला रक्तपुरवठा होत नसेल तर स्वतः रक्तवाहिनींना जोडणारे जाळे तयार करतो.

केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी करूनसुद्धा कणभर जरी ट्युमर शिल्क असेल तर पुन्हा शून्यातून उभारी घेत असतो. एका अवयवाचा कर्करोग बरा झाला असे वाटत असते तेव्हाच तो दुसऱ्या कोणत्या तरी अवयवामध्ये पसरलेला असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com