लाचप्रकरणी शीतल दाभोळकरला दिलासा 

dainik gomantak
गुरुवार, 2 जुलै 2020

ही सुनावणी येत्या शुक्रवारपर्यंत (३ जुलै) तहकूब करताना अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत तिला अटक करण्यास प्रतिबंध केल्याने दिलासा मिळाला आहे. 

पणजी

लाचप्रकरणी सध्या फरारी असलेल्या शीतल दाभोळकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयासमोर सुनावणीसाठी आला. ही सुनावणी येत्या शुक्रवारपर्यंत (३ जुलै) तहकूब करताना अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत तिला अटक करण्यास प्रतिबंध केल्याने दिलासा मिळाला आहे. 
हणजूण येथील व्यावसायिकाकडून लाच घेण्याच्या प्रकरणामध्ये हणजूण-कायसूव पंचायतीच्या तीन पंचाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंद झाली होती. सापळा रचून विभागाच्या पोलिस पथकाने हनुमंत गोवेकर याला अटक केल्यावर सुरेंद्र गोवेकर व शीतल दाभोळकर हे गायब झाले होते. सुरेंद्र गोवेकर याला दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. शीतल दाभोळकर यांचा शोध पोलिसांनी सुरू केल्यावर तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या लाचप्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा दाभोळकर यांनी अर्जात केला आहे. 

 

 

 

 

संबंधित बातम्या