Goa: पेळावदा रावण येथील रस्ता खचल्याने गावाचा संपर्क तुटला

पेळावदा रावण येथील नवीन पुलांची मागणी होती पण गोवा सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.
पेळावदा रावण येथे खचलेला पुलाचा रस्ता
पेळावदा रावण येथे खचलेला पुलाचा रस्ताDainik Gomantak

पर्ये: सत्तरीतील केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील पेळावदा रावण येथील सावंतवाडा (sawantwada at pelavada ravan of sattari taluka ) इथल्या पुलाचा रस्ता खचल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे त्यामुळे इथल्या गावाचा संपर्क तुटला आहे. आज पहाटे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या नाल्याला मोठे पाणी आल्याने हा पूल खचला. (Bridge at sawantwadi bicholim area pavada ravan was collapse)

पेळावदा रावण येथे खचलेला पुलाचा रस्ता
पेळावदा रावण येथे खचलेला पुलाचा रस्ताDainik Gomantak

सावंतवाडा येथील नाल्यावर हा सिमेंटच्या पाईपवर पूल उभारला होता. या पावसाच्या पाण्याने पुलाखालील माती वाहून गेल्याने हा रस्ता खचला गेला. खचलेल्या पुलाच्या भोकातून पाणी वाहत असून रस्त्याचा दर्शनी भाग पूर्णपणे कमकुवत झाल्याने पूर्ण रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षतेच्या कारणामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यापूर्वी हा पूल काही प्रमाणात खचला होता, त्यावेळी त्यात दगड टाकून त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. पण यावेळेस हा मोठ्या प्रमाणात खचल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांचा संपर्क सुटला आहे. दरम्यान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून नवीन पुलांची मागणी होती पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com