फोंड्यात सर्वधर्मीयांचा ‘भाईचारा’

ईद ही मित्रत्वाची पर्वणी आहे...
EID
EIDDainik Gomantak

फोंडा: हिंदूंचा गणेश चतुर्थी व दीपावली सण, ख्रिश्‍चन बांधवांचा ख्रिसमस सण तसाच मुस्‍लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजे ईद. ईद ही मित्रत्वाची पर्वणी आहे. एकत्रित भाईचारा जोपासण्याचा हा सण आहे. सर्वांना सुख, समृद्धी लाभो अशी प्रार्थना करण्याबरोबरच सर्वधर्मीयांनी एकमेकांशी एकोप्याने राहण्याचा हा सण.

अंत्रुज महाल अर्थातच फोंडा तालुका म्हणजे मंदिरांची मांदियाळी. पर्यटनासाठी कुठे जायचे असे देशी-विदेशी पर्यटकांच्या ओठांवर आले तर साहजिकच गोवा हे नाव पहिल्यांदा येते. त्यामुळे येथील सोनेरी समुद्रकिनाऱ्यांबरोबरच प्रसिद्ध मंदिरे, चर्च आणि मशिदीही धार्मिक पर्यटनाचा भाग बनून राहिली आहेत.

EID
बेरोजगारीत गोवा पाचव्या क्रमांकावर!

फोंड्यातील प्रसिद्ध साफा मशीद म्हणजे तर उत्कृष्ट बांधकामाचा एक नमुना आहे. छोटीशीच मशीद पण एका बाजूला निळ्याशार पाण्याचा तलाव, कोरलेल्या दगडांनी बांधलेली मशीद आणि परिसर यामुळे ती एकदम विलोभनीय वाटते. विशेष म्हणजे ही मशीद 1485 साली बांधली गेली, जी आज इतिहासाचा एक समृद्ध वारसा बनून राहिली आहे. सध्या या मशिदीचा ताबा केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे. या मशिदीचे बांधकाम अचंबित करणारे ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com