फोंड्यात थरकाप! वृद्ध बहिणींची क्रुरहत्या

फोंडा शहरात गजबजलेल्या भागात असलेल्या कामत रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये हे हत्याकांड घडले.
Brutal murder of elderly sisters in ponda goa
Brutal murder of elderly sisters in ponda goaDainik Gomantak

फोंडा: फोंडा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कामत रेसिडेन्सीमध्ये झालेल्या दोन वृद्ध बहिणींच्या क्रुरहत्येने राज्यात खळबळ उडाली. ही घटना काल (शनिवारी) सकाळी साडेआठ ते दुपारी बाराच्या सुमारास घडली. खून झालेल्या दुर्दैवी मोठ्या बहिणीचे नाव मंगला तुळशीदास कामत (76) तर छोट्या बहिणीचे नाव जीवन व्यंकटेश कामत (68) अशी आहेत. या दोघींचा खून कशासाठी केला असावा, याचे कारण मात्र अजून स्पष्ट झाले नाही. पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.

फोंडा शहरात गजबजलेल्या भागात असलेल्या कामत रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये हे हत्याकांड घडले. मृत दोन्ही बहिणींपैकी मोठी बहीण मंगला कामत ही विवाहित असून 2004 मध्ये तिच्या पतीचे निधन झाले होते. तिला दोन मुलगे असून एक मुलगा या दोन्ही बहिणी राहत होत्या, त्या फ्लॅटच्या दुसऱ्या मजल्यावर पत्नी व मुलीसमवेत राहतो, तर दुसरा मुलगा मडकईत कुटुंबियांसमवेत राहतो. जीवन कामत ही अविवाहित असून ती आरोग्य खात्यात परिचारिका म्हणून कामाला होती. निवृत्त झाल्यानंतरही ती आपल्या बहिणीसोबत राहत होती.

Brutal murder of elderly sisters in ponda goa
आगोंद येथे पतीने केली पत्नीची गोळी घालून हत्या

रोजच्याप्रमाणे मंगला हिचा मुलगा प्रितेश हा ढवळी येऊन दूध घेऊन आई व मावशीला देण्यासाठी फ्लॅटकडे आला असता त्याला दरवाजा उघडा दिसला. त्याने हॉलमध्ये दूध ठेवले तर त्याला किचनच्या दरवाजाकडे रक्त सांडलेले दिसले, आई व मावशी कुठे दिसेना

तपासाची दिशा फिरली

पोलिसांचे श्‍वानपथक तसेच ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या श्‍वानाने फ्लॅटच्या बाहेर येऊन रस्त्यापर्यंत धाव घेतली. तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरील एका हॉटेलपर्यंत श्‍वान गेले व परत फिरले, त्यामुळे या पथकाचा तेवढा उपयोग झाला नाही. तरीपण हल्लेखोर कदाचित हॉटेलकडे ठेवलेल्या वाहनापर्यंत गेला असावा, किंवा हॉटेलात त्याचे वास्तव्य होते काय, याबाबत तपासाची दिशा फिरली.

अर्धवट चिरलेली तांबडी भाजी...

फ्लॅटच्या हॉलमध्येच अर्धवट चिरलेली तांबडी भाजी पोलिसांना सापडली आहे. या दोन्ही बहिणींनी जेवणाची तयारी केली असावी, त्यासाठी तांबडी भाजी चिरण्यास घेतली असावी, ही अर्धवट भाजी आणि विळा तेथेच होता. दोन्ही बहिणींचा किचनमध्ये कसा काय खून झाला याचे कोडे पोलिसांना पडले आहे. या दोन्ही बहिणींनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना ढकलून बाजूला असलेल्या किचनमध्ये खुन्याने नेले काय, खुनी एकापेक्षा अधिक होते काय, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसही चक्रावले

1 फोंड्यातील या दुहेरी खूनप्रकरणाचे कारण काय असावे, याबाबत पोलिसही चक्रावले आहेत. चोरी करण्याच्या उद्देशाने किंवा मौल्यवान वस्तू सापडली नसावी, त्यातच या महिलांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केली, असा संशय आहे.

2 मालमत्तेच्या वादातून खुनाचा प्रकार घडला काय, याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. मात्र ज्या तऱ्हेने खुन्याने धारदार शस्त्राचा वापर केला, त्यावरून स्वतःला वाचवण्यासाठीच संशयिताने दोन्ही बहिणींना ठार मारले असावे, असाही कयास व्यक्त करण्यात येत आहे.

3 या दोन्ही महिला कुणाच्या अद्यात ना मध्यात होत्या. त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. मग त्यांचा खून का केला असावा. जर खुनी या महिलांचे ओळखीचे असतील तर त्यांना ओळखूनच या महिलांनी फ्लॅटमध्ये घेतले असेल, असाही संशय आहे.

Brutal murder of elderly sisters in ponda goa
Goa: वाट अडवल्याचा खटला पुन्हा सत्तरी मामलेदारच्या कोर्टात

आता भर सीसीटीव्हीवर : कामत रेसिडेन्सीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही. या इमारतीच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला एक राष्ट्रीयकृत बँक तसेच एक हॉटेल आहे. या बँकेत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार पोलिसांना घ्यावा लागणार आहे. त्यातच जवळच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. या दोन्ही कॅमेऱ्यावरून घटना घडली त्यावेळी कोण आले आणि कोण गेले याचा तपासही पोलिस करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com