गोवा विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन 24 मार्च पासून घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात दिली.

पणजी : गोवा विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन 24 मार्च पासून घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवसाचे असेल याचा कोणताही निर्णय झालेला नाही. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तो निर्णय घेण्यात येईल. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच अर्थसंकल्प मंजूर करण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून 'फणस' हे उत्तर गोव्याचे, तर 'नारळ' हे दक्षिण गोव्याचे उत्पादन म्हणून जाहीर

यामुळे कामकाज किती दिवसाचे असेल याचा निर्णय समिती घेईल. ते म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना 24 जागा सरकारी सेवेत मिळतील. तेवढ्याच जागा सरकारमध्ये त्यांच्या कोट्यातून रिक्त आहेत. उर्वरित जणांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून सेवेत घेण्यात येणार आहे. वनहक्क कायद्याचा नुसार ज्यानी दावे सादर केले आहेत त्यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

गोव्याचा अट्टल गुन्हेगार अन्वर शेखवर जीवघेणा हल्ला; पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे अनर्थ टळला !

 

संबंधित बातम्या