bus
bus

बसमालक योजनेच्या लाभापासून तीन वर्षे वंचित 

पणजी

राज्यातील खासगी प्रवासी बस मालकांना इंधन व विमा अनुदान योजना सरकारने लागू मात्र गेल्या तीन वर्षापासून त्याचा लाभ अजूनही मिळालेला नाही. या योजनेचे नूतनीकरण केले तरी त्याचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यात सुमारे १४६० खासगी बसेस असून सरकारकडून योजनेचे अनुदान मिळण्यास होणारा विलंब व कोविड - १९ च्या टाळेबंदीच्या मार्गदर्शक सूचनांमुळे हा व्यवसाय मेटाकुटीस आला आहे. 
अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, कदंब महामंडळाने प्रवासी पास सेवा सुरू केल्यानंतर खासगी बस मालकांना होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी इंधन व वीमा अनुदान योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा बस मालकांना २०१७ पासून लाभ सरकारकडून मिळालेला नाही. तीन वर्षाचे अनुदान अजून 
प्रलंबित आहे. सरकारने पूर्वी योजनेचा लाभ देताना सर्व बस मालकांना दिला होता मात्र ऑडिटमध्ये त्यात आक्षेप घेण्यात आला. ज्या मार्गावर कदंब बसेस धावतात त्या मार्गावरील खासगी बस मालकांनाच या योजनेचा लाभ मिळतो. ज्या मार्गावर कदंब बसेस धावत नाही त्या मार्गावरील बस मालकांना ही योजना लागू होत नाही. त्यामुळे सरकारला ही आर्थिक मदत देण्यास कठीण होत असल्यास कदंबची प्रवासी पास सेवा बंद करावी तसेच खासगी बस मालकांना असलेली योजनाही बंद केली जावी असा प्रस्ताव देण्यात आला होता त्यामुळे प्रवासी खासगी बसकडे आकर्षित होतील व हा व्यवसाय पूर्वीप्रमाणे पुन्हा रूळावर येण्यास मदत होईल असा त्यामागील हेतू होता. मात्र वेगळ्या बस मालक संघटनेने त्याचा विपर्यास करून काही बस मालकांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याचे ताम्हणकर म्हणाले. 
सरकारची इंधन व विमा योजना बंद होणार नाही. या योजनेचे नुतनीकरण करण्यासाठी वाहतूक संचालकांनी ती वाहतूक सचिवांकडे पाठविली आहे. त्यामध्ये त्यात काही त्रुटी काढल्या आहेत. या योजनेसाठीचा निधी सरकारने उपलब्ध करून ठेवलेला आहे. त्यामुळे येत्या गणेशचतुर्थीपर्यंत योजनेचा प्रलंबित असलेला लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर बस मालक संघटनेच्या अफवांवर कोणी विश्‍वास ठेवू नयेच. कदंब महामंडळ आधीच स्वतः अडचणीत आहे त्यामुळे कोणीही खासगी मालकांनी त्यांच्या बसेस कदंब महामंडळाला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेऊ नये. सध्या डिझेलच्या दरवाढीमुळे व कोविड - १९ च्या परिस्थितीमुळे बस व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे योजनेत इंधनासाठी ३ रुपयांऐवजी ६ रुपये वाढ तर विम्याच्या हप्त्यात २० हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपये वाढ करण्याचे निवेदन हल्लीच वाहतूक संचालकांना देण्यात आले आहे, अशी माहिती ताम्हणकर यांनी दिली. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com