‘बिझनेस गोवा’ विशेषांकांचे राज्यपालांचे हस्ते प्रकाशित

शंतनू गरूड
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्यपाल सत्य पाल मलिक यांच्या हस्ते बिझनेस गोवाच्या अकराव्या वर्धापन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. काबो राज येथील राज्यपालांचे निवासस्थानी कोरोनासाठी असलेल्या सूचनांचे पालन करीत साध्या पद्धतीने कार्यक्रम करण्यात आला.

दोनापावला

राज्यपाल सत्य पाल मलिक यांच्या हस्ते बिझनेस गोवाच्या अकराव्या वर्धापन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. काबो राज येथील राज्यपालांचे निवासस्थानी कोरोनासाठी असलेल्या सूचनांचे पालन करीत साध्या पद्धतीने कार्यक्रम करण्यात आला. राज्यपालांनी बिझनेस गोवा विशेषांकातील सर्वव्यापक लेखांबद्दल प्रकाशक व संपादक हर्षवर्धन भाटकुळी यांचे विशेष अभिनंदन केले. राज्यातील उद्योजकता व उद्योगांतील नेतृत्व हा चांगला विषय निवडल्याचे ते यावेळी म्हणाले.
कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने उद्योजकांना मोठा फटका बसला असल्याने राज्य सरकारने उद्योगांना विशेष सवलती दिल्याने ते सावरतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे. अंकातील फोकस गोवा प्रकरणात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अल्कॉन समूहाचे अध्यक्ष अनिल खंवटे यांच्या अल्कोफाईन उत्पादनाला देशभर विक्रीची मंजुरी मिळाल्याने या उत्पादनाचा यंदाचा गोवन ग्रँड म्हणून त्यावर विशेष फीचर आहे तर उद्योजक फीचरमध्ये इक्वीनॉक्स समूहाचे ऑस्कर लिमा परेरा यांच्यावर विशेष लेख आहे. गोवा स्टार्टअप पॉलिसीसंबंधी गोवा स्टार्टअपचे सीईओ अंकिता आनंद यांची विशेष मुलाखत व प्रोफेशनल डोझीयर विभागात डॉ. राहुल काकोडकर यांची मुलाखत आहे. सोशल इंडेक्समध्ये पणजी रिव्हेरा रोटरी क्लबचे अध्यक्ष रायन कोस्ता यांनी या वर्षातील क्लबसमोरील आव्हाने व योजना यावर भाष्य केले आहे. बोन अपेटाईटसारख्या विशेष फिचरमधील केक फॅक्टरीच्या मालक जान्हवी आमोणकर आणि शेफ रायन सेमेलहागो यांचा प्रवास वाचकांना प्रेरणादायी ठरणार आहे. या व अशा इतर फीचर्समधून संपादकांनी आपल्या विशेषांकाला सजवून तो अधिक वाचनीय केला असल्याचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना संपादक प्रकाशक हर्षवर्धन भाटकुळी यांनी राज्यपालांचे आभार मानल्यावर सांगितले की, कोविड-१९मुळे गंभीर परिस्थिती असूनही आमचे मुद्रक, जाहिरातदार, तंत्रज्ञ, वाचक व राज्यातील उद्योजकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा ११वा वर्धापन विशेषांक प्रसिद्ध करणे शक्य झाले. कोरोना निर्बंधांमुळे दरवर्षीप्रमाणे विशेष कार्यक्रम करणे शक्य नसले तरीही सर्वांच्या पाठिंब्यामुळे प्रकाशन करता आले याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.

संपादन - संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या