"अब की बार भाजपा की हार": रमाकांत खलप

भाजप सरकार (BJP Government) सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून महागाई, भ्रष्टाचार यामुळे गोव्यातील जनता या भाजप राजवटीला कंटाळली आहे.
"अब की बार भाजपा की हार": रमाकांत खलप
Ramakant KhalapDainik Gomantak

साखळी: भाजप सरकार (BJP Government) सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून महागाई, भ्रष्टाचार यामुळे गोव्यातील जनता या भाजप राजवटीला कंटाळली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच नारा ऐकायला मिळत आहे "अब की बार भाजपा की हार". भाजपचा पराभव करुन पुन्हा एकदा कॉग्रेसचे (Congress) सरकार सत्तेवर आणण्यासाठी जनता सज्ज झाली आहे असे उदगार माजी केंद्रीय मंत्री तथा कॉग्रेसचे जेष्ठ नेते रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांनी साखळी येथे काढले.

कॉग्रेसतर्फे "म्हारगायेचो जागोर" हे अभियान साखळी भागात राबविण्यात आले.या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री तथा कॉग्रेसचे जेष्ठ नेते रमाकांत खलप, साखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, साखळी गट कॉग्रेस अध्यक्ष मंगलदास नाईक, माजी आमदार प्रताप गावस, साखळीच्या माजी नगराध्यक्ष सुनिता वेरेकर, साखळीचे माजी सरपंच प्रविण ब्लेगन, उत्तर गोवा कॉग्रेसचे सचीव अनंत पिसुर्लेकर, रेणूका देसाई, संदीप काणेकर, फोंडेकर, आमोणकर आदींची उपस्थिती होती. साखळी येथील नवीन कदंबा बसस्थानकाजवळ जमलेल्या कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणा दिल्या. माजी आमदार प्रताप गावस यावेळी बोलताना म्हणाले महागाईने कळस गाठला आहे.जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढवून या सरकारने सर्वसामान्य माणसांचे जिणेच हैराण केले आहे.

Ramakant Khalap
आमदार अपात्रता याचिकेवर 10 डिसेंबरला होणार अंतिम सुनावणी

भाजपची राजवट नागरिकांना असह्य झाली आहे. कॉग्रेस शिवाय पर्याय नाही हे लोकांना कळून चुकले आहे. साखळीच्या माजी नगराध्यक्ष सुनिता वेरेकर यावेळी बोलताना म्हणाल्या देशाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. भाजप जनतेला केवळ खोटी आश्वासने देत असतो.भाजप राजवटीत जनतेला अच्छे दिना ऐवजी बुरे दिनच लाभले.भाजपला सत्तेवरुन खाली खेचा असे आवाहन केले.माजी सरपंच प्रविण ब्लेगन म्हणाले भाजपची सर्वत्र हुकुमशाही चालली असून जनता भरडली जात आहे. सरकारी यंत्रणेचाही गैरवापर केला जात आहे. शेतीविषयक बिल मागे घेण्यासाठी कॉग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता.केंद्र सरकारने हे बिल मागे घेऊन आपला पराभव मान्यच केला आहे.

साखळी बसस्थानकावरुन या अभियानाला प्रारंभ झाला.साखळी बाजार परिसरात घरोघरी तसेच दुकानात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भेट देऊन भाजप सरकारचे अपयश, भ्रष्टाचार, वाढत्या महागाई बाबत जनजागृती केली.तसेच नागरिकांना पत्रके वाटण्यात आली व येत्या निवडणूकीला कॉग्रेस ला साथ देण्याचे अवाहन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com