Bicholim: डिचोलीत 2 पंचायतीतील दोन जागांसाठी पोटनिवडणूक; 6 उमेदवार रिंगणात

चिन्हांचे वाटप; वन-म्हावळींगे, वेळगे पंचायत गावात प्रत्येकी तीन उमेदवार
Bicholim bypoll
Bicholim bypollDainik Gomantak

Bicholim ByPoll: डिचोली तालुक्यातील 2 पंचायतींच्या मिळून दोन प्रभागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी तीन मिळून सहा उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 25 मार्च रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे.

आज (गुरुवारी) अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत वेळगे पंचायतीतून एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Bicholim bypoll
Yuri Alemao: आगामी विधानसभा अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे 'हे' दोन महत्वाचे ठराव...

डिचोलीचे मामलेदार आणि निवडणूक अधिकारी राजाराम परब यांनी ही माहिती दिली. दरम्यान, निवडणूक रिंगणातील उमेदवारांना गुरुवारी दुपारीच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. खर्च मर्यादा तसेच निवडणुकीसंदर्भात उमेदवारांना मार्गदर्शनही करण्यात आले.

दोन प्रभागांसाठी पोटनिवडणूक

गेल्यावर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीत वन-म्हावळींगे पंचायतीच्या प्रभाग-6 मधून निवडून आलेले पंचसदस्य भागो वरक यांचे निधन झाल्याने या प्रभागासाठी पोटनिवडणूक होत आहे.

राज्यात निवडून आलेल्या पंचसदस्यांपैकी स्व. भागो वरक सर्वात वयस्कर पंचसदस्य होते. तर वेळगे पंचायतीच्या प्रभाग-5 चे पंच सदस्य दुर्गादास नाईक यांनी राजीनामा दिल्याने या प्रभागासाठी पोटनिवडणूक होत आहे.

Bicholim bypoll
Goa Weather : गोव्यात पुढील 4-5 दिवसात पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

अंतिम उमेदवार

पोटनिवडणुकीसाठी पंचायतवार रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे-

वन-म्हावळींगे पंचायत- शाहू बोमो वरक, एकनाथ सदानंद च्यारी आणि राजेंद्र वसंत नार्वेकर.

वेळगे पंचायत- सर्वेश नवसो घाडी, साक्षी सुदेश प्रियोळकर आणि महेश मधुकर गवंडे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com