बायथाखोल मार्ग वाहतुकीस धोकादायक

Bypass road dangerous to traffic
Bypass road dangerous to traffic

 बोरी : बायथाखोल बोरी येथील रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाल्याने या रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात घडत आहेत. बोरीहून फोंडा, मडगाव वास्कोला जाणाऱ्या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावरील बायथाखोल या उंचवट्याचावरचा रस्ता यंदाच्या पावसात पूर्णपणे धुपून जाऊन खड्डेमय बनलेला आहे. 


दै. गोमन्तक मध्ये या रस्त्याच्या दयनीय स्थितीबद्दल छायाचित्रासह वृत्त प्रसिध्द केल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाने  या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. परंतु पावसात हे दुरुस्तीकाम पूर्णपणे वाहून गेले. गतवर्षीच्या पावसात वाहून गेलेल्या रस्त्याचे तीन खेपा दुरुस्तीकाम केले परंतु तीनही खेपा रस्ता पावसामुळे वाहून गेल्यापासून हा रस्ता नादुरुस्त स्थितीत आहे.

यंदा जास्त पाऊस पडल्याने तर रस्त्याची पूर्णपणे वाताहात लागून गेली आहे. रस्त्यावरचे हे खड्डे वाटवून वाहने नेताना वाहनचालकांना कसरत करत जावे लागते. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा बोरीचे सरपंच व उपसरपंचांनी दिला होता.  
मृत्यूचा सापळा बनलेल्या बायथाखोलच्या या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी अशी वाहनचालक व रहिवाशांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com