वास्कोतल्या कोळसा जनआंदोलनाची मुख्‍यमंत्र्यांकडून २४ तासांत दखल

C M Pramod Sawant instructed to Goa State Pollution Control Board to check the current situation of pollution caused by coal handling in Vasco
C M Pramod Sawant instructed to Goa State Pollution Control Board to check the current situation of pollution caused by coal handling in Vasco

पणजी : वास्कोत कोळसा हाताळणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची सद्यस्थिती तपासून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली.  राज्यातून होणारी दगडी कोळशाची वाहतूक निम्म्याने घटवण्यासाठी प्रयत्न करण्याचे जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली आहे. कोळसा वाहतुकीला विरोध करणारे काल मंत्रालयाच्या दारावर थडकल्यानंतर सरकारने या जनआंदोलनाची दखल घेतली आहे.

कोळशाची आयात मुरगाव बंदरात होते. तेथून कोळसा बाहेर नेला जातो. जेएसडब्ल्यू, वेदान्ता आणि अदानी अशा तीन कंपन्या कोळसा हाताळतात. जेएसडब्ल्यू कंपनीकडे ५.२ दशलक्ष टन प्रती वर्ष, ५ दशलक्ष टन प्रतीवर्षचा परवाना अदानी कंपनीकडे आहे. १ दशलक्ष टनाहून कमी कोळसा हाताळण्याची परवानगी वेदान्ताकडे आहे. वेदान्ताचा कोळसा खोल समुद्रात तंरगत्या धक्क्यावर ज्याला मुरींग डॉल्फीन म्हणतात तेथे उतरवला जातो. उर्वरीत दोन कंपन्या जो कोळसा आणतात तो राज्याबाहेर नेला जातो. एक दोन कंपन्यांला १ दशलक्ष टनापेक्षा कमी कोळसा स्थानिक पातळीवर लागतो तो पुरवला जातो. गोवा कार्बन, वेदान्ता, गोवा स्पॉन्ज आदी कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

एमपीटीकडून आणि मंडळाकडून या साऱ्याची माहिती घेतली आहे. मंडळाची प्रदूषणावर नजर आहे. ते प्रदूषणाची पातळी मोजत आहेत. या साऱ्याचा फेरआढावा घ्या, पुन्हा मोजणी करा आणि अहवाल सादर करा, असे त्यांना सांगितले आहे. त्यानंतर कोळसा हाताळणीत पन्नास टक्के घट करण्यावर काम सुरू करता येणार आहे. बंदराला उत्पन्नाचे अन्य साधन मिळाल्यानंतर कोळसा हाताळणी बंद करण्याचाही विचार केला जाऊ शकतो.

सत्ताधारी आमदारांनी आंदोलने करू नयेत : तानावडे

कोळसा वाहतूक कमी केली पाहिजे, अशी भाजपची अधिकृत भूमिका आहे. आमदारांनी आपली प्रतिष्ठा जपली पाहिजे. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गोष्टीत सहभागी होऊ नये. सरकारविरोधात सत्ताधारी आमदारांनी आंदोलने करू नयेत. सर्वसामान्य जनता आंदोलने करू शकते. मात्र त्यात आमदारांनी सहभागी होऊच नये. आमदारांना याविषयी काही संभ्रम असेल तर सरकार व पक्षाशी त्यांनी चर्चा केली पाहिजे. मी याबाबत आमदारांशीही स्वतंत्रपणे बोलणार आहे, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे म्‍हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोळसा वाहतुकीत घट घडवून आणतो, असे आश्वासन दिले आहे. ती घट काही एका रात्रीत होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना संधी दिली गेली पाहिजे. आततायीपणा करून काहीच साध्य होणार नाही.

अधिक वाचा : 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com