गोव्यात कोळशावरून पुन्‍हा धुरळा!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

गोव्यातील कोळसा हाताळणीस आपल्या कारकिर्दीत वाढ करण्यास परवानगी दिली, तर त्याचे पुरावे, तसा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर करावेत, असे आव्हान आज विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिले.

पणजी :  कोळसा हाताळणीस आपल्या कारकिर्दीत वाढ करण्यास परवानगी दिली, तर त्याचे पुरावे, तसा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर करावेत, असे आव्हान आज विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिले. ते आव्हान स्वीकारताना जे काही पुरावे त्यांना हवे असतील ते विधानसभेत सादर करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

काँग्रेस मुख्यालयात इंदिरा गांधी जयंती कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कामत यांचे पत्रकारांनी कोळसा वाहतूक आपल्या मुख्यमंत्रीकाळात वाढवण्यास आपण परवानगी दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी वरीलप्रमाणे आव्हान दिले. ते म्हणाले,  कोळसा हाताळणीस वाढ करण्यास सरकारने परवानगी दिल्‍याचे माझ्या सहीचा एक तरी दस्तावेज मुख्यमंत्र्यांनी सादर करावा, असे माझे त्यांना आव्हान आहे. केवळ बोलून काही होत नाही. मला याआधीही मोठे भय दाखवण्यात आले. जे कोणी आज हयात नाहीत त्यांच्यावर बोलणार नाही. वेळ आल्यावर माझ्याकडे असलेली कागदपत्रे मी खुली करेन. पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी यावेळी काँग्रेसचे सरकार होते व आता सरकार ज्यांचे आहे त कोळसा हाताळणी का बंद करत नाहीत, केवळ दोषारोष करण्यातच का धन्यता मानत आहेत, अशी विचारणा केली.

संबंधित बातम्या