Calangute Electricity Shortage: कळंगुट भागात विजेचा खेळखंडोबा; लोक संतप्त

वाढत्या तापमानाचा सामना करणाऱ्या स्थानिकांनी वीज विभागाकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही
Electricity Shortage
Electricity Shortage Gomantak Digital Team

Calangute Electricity Shortage: वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कळंगुट येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार, वाढते तापमान आणि वारंवार खंडित वीज यामुळे जगणे कठीण बनले आहे.

वाढत्या तापमानाचा सामना करणाऱ्या स्थानिकांनी वीज विभागाकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही.

सूत्रांनी माहिती दिली की, नुकतेच नवीन उपकेंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले, तरीही किनारपट्टीच्या गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले,की आमच्या भागात वारंवार वीज प्रवाह खंडित होत आहे.

Electricity Shortage
Unique Wedding: अनोख्या लग्नाची अनोखी पंगत, पाहुण्यांसोबत जेवल्या गायी, कुत्री, मुंग्या!

परिणामी विजेवरील उपकरणेही निकामी होत आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी या प्रश्नावर चर्चेसाठी पंचायत, वीज विभाग आणि वीजमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. काही ग्रामस्थ वीज कार्यालयात वीज अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडणार आहेत.

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले, की संपूर्ण गावाला विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड निराशा आहे.

"लोक वीज विभागाकडे तक्रारी करत आहेत, परंतु अभियंते हतबल असल्याचे दिसून येते. काही गावकऱ्यांनी माझ्याकडे जाऊन विभाग अभियंत्यांची बैठक घेण्याची विनंती केली. विभागाला या समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग शोधण्याची वेळ आली आहे, असेही सिक्वेरा म्हणाले.

Electricity Shortage
National Games 2023: लगोरी, रोल बॉल, काल्लियारापट्टू'सह विविध पारंपरिक खेळांचे राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण

दक्षिण गोव्यात 21 मे रोजी खंडित वीज

  • दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी दुरुस्तीकामांसाठी 21मे रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, असे वीज खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. यात21 रोजी सकाळी 7 ते दुपारी ३ वाजेपर्यंत फोंड्यातील पंचवाडी परिसर वगळता संपूर्ण दक्षिण गोव्यातील पुरवठा खंडित राहिल.

  • 20 केव्ही शेल्डे उपकेंद्र, 220 केव्ही कुंकळ्ळी उपकेंद्र व 110 केव्ही वेर्णा उपकेंद्रावरुन होणारा वीजपुरवठा सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.

Electricity Shortage
Belgaum Flights: गोव्यात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध; बेळगावला सुरू होतेय थेट विमानसेवा
  • काणकोण, सासष्टी, सांगे, केपे, मुरगाव तालुका, धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल दाबाळ, शिगाव कुळे, मोले पंचायत परिसर तसेच फोंडा तालुक्यातील पंचवाडी पंचायत परिसर यात समाविष्ट आहे.

  • यापूर्वी शिमगोत्सवामुळे दुरुस्तीकामे लांबणीवर टाकली होती. त्यानंतर ३० एप्रिल तारीख ठरवूनही रद्द झाली. आता तिसऱ्यांदा मान्सूनपूर्व कामांसाठी २१ मे रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com