Calangute : कळंगुट मधील अवैध धंदे बंद करा; ग्रामस्थांचा एल्गार

आमदार, सरपंचही झाले निषेध मोर्चात सहभागी
Calangute
CalanguteDainik Gomantak

Calangute : कळंगुटमध्ये आज रविवारी ग्रामस्थांच्या वतीने अंमली पदार्थ, अवैध पध्दतीने चालणारा वेश्याव्यवसाय, डान्स बारविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. येणाऱ्या भावी पिढीसाठी कळंगुट गावाचे रक्षण करण्यासाठी या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते असे यावेळी स्थानिकांनी सांगितले. कळंगुटचे आमदार मायकल लोबो व कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी या रॅलीत सहभाग घेतले होता.

Calangute
Margao : मडगावात फातीमा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दुकानावर छापा; दोघांना अटक

कळंगुटमध्ये मध्ये बेकायदेशीर कृत्यांना ऊत आला आहे. या कृत्यांमुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत त्याच्या विरोधात आज जांभळेश्‍वर मंदिर ते बागा येथे मोर्चा काढण्यात आला. "अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय आणि इतर सर्व बेकायदेशीर कृत्ये आमच्या गावात केली जात आहेत. आमचे गाव या सर्व बेकायदेशीर कृत्यांपासून वाचावे यासाठी कळंगुट व परिसरातील ग्रामस्थांसह आम्ही कळंगुटचे तरुण असा शांततापूर्ण निषेध मोर्चा काढत आहोत अशी माहिती प्रसिध्दिपत्रकाद्वारे देण्यात आली होती. या आवाहानाला प्रतिसाद देत कळंगुट ग्रामस्थांनी शेकडोंच्या संख्येने निषेध मोर्चाला उपस्थिती लावली.

Calangute
Mahadayi Water Dispute: म्हादईवर राजकारणविरहीत चर्चा व्हावी; सभापती रमेश तवडकरांनी स्पष्ट केली भूमिका

गेल्या काही वर्षांपासून डान्सबार व मसाज पार्लरच्या नावे चालणाऱ्या गैरकृत्यांमुळे कळंगुटचे  नाव बदनाम होत आहे. टाऊट्स (दलाल) लोक देशी पर्यटकांना सर्वकाही पुरवण्याचे आमिष दाखवून व नंतर त्यांना डान्सबार तसेच मसाज पार्लरमध्ये नेऊन त्यांना मारझोड करून लुबाडत आहेत. हे प्रकार कळंगुटमध्ये सर्रासपणे घडत आहेत. शिवाय या डान्सबारच्या नावाखाली सदर ठिकाणी इतर अवैध धंदे चालवले जात आहेत अशी तक्रार स्थानिकांतून केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com