रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गोव्यात ‘कॉल सेंटर’ सुरू

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

गृह अलगीकरणातील रुग्णांची नियमित माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने कॉल सेंटर सुरू केले आहेत.

पणजी: गृह अलगीकरणातील रुग्णांची नियमित माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने कॉल सेंटर सुरू केले आहेत. या कॉल सेंटरमधून ठराविक वेळेला गृह अलगीकरणातील रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची प्राणवायू पातळी, शारीरिक तापमान, रक्तदाब आदी वैद्यकीय भाषेत चौकशी करतील. याशिवाय गृह अलगीकरणात असलेल्यांना आणखी काही गरज आहे का याची विचारपूसही या कॉल सेंटरमधून केली जाणार आहे.(A call center has been set up in Goa to enquire about the condition of patients)

गोव्यातील महाविद्यालयीन ऑनलाइन वर्ग बंद

तिसवाडी तालुक्यासाठीचे केंद्र कला व संस्कृती संचालनालयाच्या संस्कृती भवनात सुरू करण्यात आले असून त्या केंद्रात 27 जण नियुक्त करण्यात आले आहेत. आज दिवसभरात या कॉल सेंटरमधून पहिल्याच दिवशी 50 रुग्णांशी संवाद साधण्यात आला. बार्देशसाठीचे केंद्र पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या बोर्डरूमध्ये सुरू करण्यात आले आहे. तेथे 14 जणांची नियुक्ती केली आहे. या केंद्रातून 150 रुग्णांशी संवाद साधण्यात आला. सत्तरीसाठीचे केंद्र होंडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू केले आहे. तेथे संवादासाठी 12 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सावधान! राजधानीत दररोज 80 ते 100 जणांना कोरोनाचा संसर्ग  

डिचोलीसाठीचे केंद्र शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू करण्यात आले असून तेथे 25 जणांची नियुक्ती  करण्यात आली आहे. तेथून आज पहिल्या दिवशी 10 रुग्णांशी संवाद साधण्यात आला आहे. पेडणे तालुक्यासाठीचे केंद्र विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुरू करण्यात आले असून तेथे 30 जणांची नियुक्ती संवादासाठी केली आहे.
 

संबंधित बातम्या