कॅम्प अर्बन क्रेडिट सोसायटी कोरगाव शाखेचे स्थलांतर

प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

कॅम्प अर्बन क्रेडिट सोसायटीच्या कोरगाव शाखेचे दूरध्वनी कार्यालयाजवळील नव्या प्रशस्त जागेमध्ये मंगळवारी स्‍थलांतर करण्यात आले.

पेडणे: कॅम्प अर्बन क्रेडिट सोसायटीच्या कोरगाव शाखेचे दूरध्वनी कार्यालयाजवळील नव्या प्रशस्त जागेमध्ये मंगळवारी स्‍थलांतर करण्यात आले. उद्‍घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोरगावच्या सरपंच सौ. स्वाती गवंडी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे हे होते.

खास निमंत्रित पाहुणे म्हणून गोवा राज्य सहकारी बँकेचे कोरगाव शाखा व्यवस्थापक शरद गाड, श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुदन बर्वे, श्री कमळेश्वर हायस्कूल देऊळवाडाचे मुख्याध्यापक भालचंद्र हिरोजी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अभियंता आबा गावडे, श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव मोहन आरोलकर, खजिनदार नीळकंठ शेट्ये, सदस्य सखाराम गावडे, माजी मुख्याध्यापक लक्ष्मण गावडे, कॅम्प अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन रवींद्र राऊत, व्हाईस चेअरमन विठोबा बगळी, संचालक दयानंद मांद्रेकर, अमोल राऊत, जयानंद गावकर, जालंदर गावडे, व्यवस्थापकीय हेमंत गोसावी तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रारंभी संचालक दयानंद माद्रेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चेअरमन रवींद्र राऊत, संचालक जयानंद गावकर, अमोल राऊत यांनी  जास्वंदीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले. व्हाईस चेअरमन विठोबा बगळी यांनी सूत्रसंचालन, संचालक अमोल राऊत यांनी आभार मानले.
 

संबंधित बातम्या