कोरोनाची काळजी म्हणून ट्रान्स्परन्सी प्लास्टिक भिंत

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय काडून आपले व्यवहार करीत असतात.

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय काडून आपले व्यवहार करीत असतात. त्या पैकीच सांगे तेथील कर्नाटक बॅंक आपला व्यवहार हाताळताना कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अगदी ट्रान्स्परन्सी व्यवहार करीत असल्यामुळे बॅंक कर्मचारी पूर्वी इतक्याच उत्साहाने ग्राहकांना सेवा देत आहे. एक चांगला उपाय म्हणून पहिला जात आहे. 

 सांगेतील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बॅंक म्हणजे कर्नाटक बॅंक लि. सांगेत अनेक बॅंक, वित्तीय पतसंस्था आहे. सर्वच बॅंकात ग्राहकांना  वेगवेगळा अनुभव असतो. पण कर्नाटक बॅंकेमध्ये कोणीही कर्मचारी आला अन् गेला म्हणून त्याचा परिणाम ग्राहकावर होत नाही. येणारा प्रत्येक बॅंक कर्मचारी ग्राहकाशी नम्रतेने आणि तितक्याच आपुलकीने वागत असल्यामुळे प्रत्येक ग्राहकाला ही बॅंक आपली वाटत आहे. या महामारीत कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय आणी कटकटी निर्माण केल्या आहे . काहीजण दारातच अडवितात तर काहीजण चहापेक्षा किटली गरम प्रमाणे ग्राहकांना वागवितात. 

 या बॅंकेत पूर्वी इतकाच ग्राहक कायम असतो. कर्मचाऱ्यांना ग्राहकांचा थेट संसर्ग होऊ नये म्हणून ग्राहक आणि बॅंक कर्मचारी यांच्यामध्ये प्लास्टिकची ट्रान्स्परन्सी भिंत उभी केली आहे. देवाण घेवाण साठी खाली अर्धा फूट अंतराचा चौकोन केला आहे त्यातून ग्राहक आपला व्यवहार हाताळीत असतात. बाकीचे सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क ही उपाय योजना आहेच. पण ट्रान्स्परन्सी कारभारात ग्राहक आणि कर्मचारी पूर्वी इतकेच संबंध ठेऊन असल्याचे दिसून येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कर्नाटक बॅंकेने केलेली उपाय योजना नक्कीच चांगली आहे.

संबंधित बातम्या