Canacona : मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचा 28 वा स्थापना दिवस

dele.jpg
dele.jpg

देळे- काणकोण (Canacona) येथील ज्ञान प्रबोधिनी मंडळाच्या (Prabodhini Mandal) श्री मल्लिकार्जुन आणि श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचा  २८ वा स्थापना दिन. त्या स्थापना दिनानिमित्त प्राचार्य डॉ.मनोज कामत (manoj kamat) यांनी महाविद्यालयाच्या २८ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला व त्याचप्रमाणे दूरदृष्टी ठेवून महाविद्यालयाची स्थापना केलेल्या संस्थापक विश्वस्ताबद्धल कृतज्ञता व्यक्त केली.डॉ.जिबलो नाईक गावकर(dr jiblo morto naik gaonkar), जयसिंगराव राणे,किसन नाईक गावकर, मंजू देसाई, रामदास माजाळकर,महेंद्र देसाई या संस्थापक सदस्यांनी  मोठ्या कष्टाने या संस्थेची स्थापना केली.सद्या रामदास माजाळकर (Ramdas Majalkar) हे संस्थेचे अध्यक्ष आहेत.(Canacona: 28th founding day of Mallikarjun and Chetan Manju Desai College)

चेतन मंजू देसाई उपाध्यक्ष, मंजूनाथ देसाई सचिव, कृष्णराव गावकर संयुक्त सचिव,राजेंद्र देसाई खजिनदार,कमलाकर नाईक गावकर सदस्य  आहेत.२४ जून १९९३ मध्ये या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.प्राचार्य डॉ.कामत यांनी यावेळी महाविद्यालयासाठी जमिन उपलब्ध करून दिल्याबद्धल  देळे वासीयांचे खास आभार मानले. उपप्राचार्य डॉ.एफ.एम.नदाफ यांनी महाविद्यालयाने गेल्या दहा वर्षात नोंद केलेल्या काही विक्रमा सबंधी माहिती दिली.प्राध्यापिका डॉ.रूपा च्यारी,प्रा.विविध पावस्कर, रामदास सावंत व अन्य कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन व काणकोणवासीय,विद्यार्थी याच्या सहकार्याबद्धल त्यांना धन्यवाद दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com