Canacona: काणकोणमध्ये दिला जाणार ‘चलो रेल्वे स्टेशन’चा नारा

Canacona: रेल्वे गाड्यांना थांबा द्या, 15 डिसेंबरला आंदोलनाद्वारे नागरिकांची मागणी करणार
railway station
railway stationDainik Gomantak

Canacona: काणकोण रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्या या मागणीसाठी 15 डिसेंबरला ‘चलो रेल्वे स्टेशन’ असा नारा स्वाभिमानी जागृत संघटनेने दिला आहे.

कोविड काळात काणकोण रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता, तो पूर्ववत सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे येथील रहिवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक मंच व स्वाभिमानी जागृत संघटनेने दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन त्याचप्रमाणे रेल्वे यंत्रणेला निवेदन सादर केले होते. मात्र अद्याप त्याची कार्यवाही झाली नाही.

काणकोणात पाळोळे, आगोंद हे किनारे जागतिक स्तरावर पर्यटन किनारे म्हणून प्रसिद्ध आहेत. सरकार पर्यटनवृद्धी करण्याची भाषा करीत आहे. मात्र, रेल्वेसारखी मुलभूत सोय उपल्ब्ध करून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्याचसाठी सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी15 डिसेंबरला चलो रेल्वे स्टेशन हा नारा देण्यात आला असल्याचे जनार्दन भंडारी यांनी सांगितले.

...या गाड्यांना थांबा द्या : सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वे स्टेशनवर थांबा द्या, नेत्रावती एक्स्प्रेस, मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, गांधीधाम - नागरकोयल एक्स्प्रेस, ओखा - एर्नाकुलम एक्स्प्रेस यांना थांबा देण्याबरोबरच नवीन सुरू करण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

railway station
Parrikar Science Exhibition: पर्रीकर विज्ञान महोत्सवाला मडगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘प्रवासी आरक्षण सेवा सुरू करा’: काणकोण रेल्वे स्टेशनवर प्रवासी आरक्षण सेवा सुरू करावी, वेगळ्या प्रवासी कोट्याची तरतूद करावी, रेल्वे पोलिस आऊट पोस्ट सुरू करावे अशा वेगवेगळ्या पाच मागण्या करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com