काणकोणातील जनजीवन पूर्वपदावर

Dainik Gomantak
बुधवार, 6 मे 2020

पावसाळ्याची पूर्व तयारी व डागडुजी करण्यासाठी बांधकाम साहित्य विक्री दुकानात गर्दी होती.त्याचबरोबर प्लास्टिक ताडपत्र्या खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली.

सुभाष महाले

काणकोण

चाळीस दिवसाच्या लॉकडाऊन नंतर काही व्यवसायाना मुक्तद्वार दिल्याने  काणकोणात बहुतेक सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे बाजारात  पूनश्च गर्दीही वाढू लागली आहे.सोमवार पासून भाजी मार्केटपासून मासे विक्रीही सुरू झाली आहे.त्याचबरोबर वाईन दुकानातून विक्री सुरू झाल्याने गर्दीत भर पडली आहे.गोवा बागायतदार शाखेत सामाजिक अंतर राखून मालाची विक्री करण्यात येत आहे.सोमवार पासून बॅंकामध्ये स्थानिक रहिवाश्या बरोबरच परदेशी नागरीकाच्या रांगा लागल्या होत्या त्याचबरोबर स्टेट बेंंकेच्या एटीएम बाहेर परदेशी पर्यटकानी गर्दी केली होती.पावसाळ्याची पूर्व तयारी व डागडुजी करण्यासाठी बांधकाम साहित्य विक्री दुकानात गर्दी होती.त्याचबरोबर प्लास्टिक ताडपत्र्या खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली.काणकोण मधील बहुतेक घाऊक मद्यविक्रेत्यानी सोमवार पासून दुकाने खुली करून मद्य विक्री केली मात्र कोणत्याच दुकानावर रांगा लागल्या नाहीत.

मडगाव-कारवार हमरस्त्याच्या कडेला चावडी येथे चापोली धरण जलाशयाचे पाणी वाहून आणण्यासाठी मोठ्या व्यासाची जलवाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आले.त्यामुळे काही प्रमाणात बाजारात वाहतूकीची कोंडी झाली.पोकलीनद्वारे हे खोदकाम करण्यात येत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला.

संबंधित बातम्या