Canacona: पाच दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल

काणकोण लोकोत्‍सव: लाखाहून अधिक जणांनी दिली भेट; विक्रेत्‍यांना मोठा लाभ
Canacona Lokouttasav
Canacona LokouttasavDainik Gomantak

आदर्श ग्राम-आमोणे-पैंगीण येथे आयोजित लोकोत्सवात पाच दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. लोकोत्सवात कंदमुळे, पारंपरिक खाद्य, वनौषधी व इतर मिळून सुमारे चारशे स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्याशिवाय काही स्टॉल्स प्रदर्शनीय होते.

लोकोत्सवाच्या प्रवेशद्वाराबाहेर खाजे विक्री, चहा, भजी, कलिंगड विक्री व अन्य साहित्याची शंभरहून जास्त दुकाने उघडण्यात आली. लोकोत्सवाच्या मुख्य आवारात पावभाजी, नाचण्याचे आमिल, पातोळ्या, दोणे, उकडलेली कंदमुळे आदी पारंपरिक खाद्य हॉटेल्‍स उभारण्यात आली होती.

पाच दिवसांत सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनी लोककला, स्पर्धा, लोकगीते, साहसी खेळ यांचा आनंद लुटताना या पारंपरिक खाद्यपदार्थांवर ताव मारला. त्याचप्रमाणे या आधुनिक काळात काहींना नाचण्याचे आमिल व पोल्लितील भाकरीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.

काणकोण लोकोत्सवात तर कंदमुळांचा मेगा बाजारच भरला होता. सुमारे शंभरपेक्षा जास्त स्वयंसाहाय्य गटाच्या महिला स्टॉलवर कंदमुळांची विक्री करत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामध्ये प्रामुख्याने अळू माडी, काटे कणगा, झाड कणगा, चिरके, चिरकुला यांचा समावेश होतो. त्याशिवाय भोपळा, शेवग्याच्या शेंगा, हिरव्या भाज्या यांचीही रेलचेल होती.

Canacona Lokouttasav
Goa Tourism: गोव्याचे पर्यटन म्हणजे फक्त किनारे, सीफूड नव्हे तर...

वनौषधी विकणारे सुमारे साठ वैदू या लोकोत्सवात सहभागी झाले होते. मोठ्या कुतूहलाने नागरिक वैदूंकडे जाऊन आपले दुखणे व त्यावर उपाय याची माहिती घेत होते. त्याचप्रमाणे वैदूंच्या शिफारशीनुसार वनौषधी विकत घेत असल्याचे चित्र दिसत होते.

लोकोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. मात्र, लोकोत्सवाच्या निमित्ताने या सर्व व्यवहारांत सहभागी विक्रेत्यांच्या हाती चार पैसे जमा झाले, ही या लोकोत्सवाची मोठी जमेची बाजू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com