काणकोण आठवडी बाजार समस्यांच्या गर्तेत

रोगराईची भीती : पालिकेने स्वच्छतेबाबत दक्ष राहण्याची मागणी
काणकोण आठवडी बाजार समस्यांच्या गर्तेत
Market Dainik Gomantak

काणकोण : काणकोण पालिकेचा आठवडी बाजार वाहणारे गटार असलेल्या व दुर्गंधीयुक्त गलिच्छ परिसरात भरत आहे. पालिकेकडून तो परिसर स्वच्छ केला जात नाही.त्यामुळे भाजी व अन्य विक्रेत्यांना या गलिच्छ परिसरात बसूनच विक्री करावी लागत आहे. पावसाळ्यात या स्थितीत आणखी भर पडत आहे. घोंगावणाऱ्या माश्या व डांस यामुळे येथे विकली जाणारी भाजी व अन्य खाद्यपदार्थ ग्राहकांनी सेवन करणे आरोग्यास धोकादायक आहे, असे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी सांगितले. पालिकेने स्वच्छतेबाबत दक्ष रहावे,अशी मागणीही होत आहे. (Canacona Municipality weekly market in Garbage )

ज्या ठिकाणी भाजी मार्केट भरते तेथून एक गटार वाहते. त्याशिवाय एक टाकी आहे. गटार व टाकी पाण्याने भरली असून त्यात डासांची पैदास होत आहे. शनिवारचा बाजार भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी कचरा उचल होत नसल्याने कुजणारा भाजीचा कचरा इतस्ततः विखुरल्याचे चित्र दिसत आहे. पालिका भवन उभारण्यात येत आहे. मात्र पालिका इमारतीसमोर असलेल्या ध्वजस्तंभाजवळ साचलेल्या कचऱ्यावर गुरे ताव मारताना दिसतात. हे ओंगळवणे चित्र नित्याचे झाले आहे, असे गावकर म्हणाले.

Market
केप्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी लंपास

काणकोणच्या आठवडी बाजारात भाजी, तयार कपडे व अन्य मालाची विक्री किमान साडे तीनशे विक्रेते येत असतात. पालिका या विक्रेत्यांकडून किमान पन्नास रुपये ते दोनशे रूपये पर्यंत सोपोकर संकलित करते.सोपो कराच्या माध्यमातून दर आठवड्याला सुमारे पन्नास हजार रूपये महसूल प्राप्त होतो.मात्र एवढा महसूल मिळूनही पालिका स्वच्छतेच्या बाबतीत निष्क्रिय असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com