
काणकोण येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेला धमकावत ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार दिनांक 19 सप्टेंबर रोजी काणकोण पोलिसात केली होती. यावरुन संशयिताला पोलिसांनी आज ताब्यात घेतले असून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
(canacona police registers fir against and arrest pravin goakar allegedly raping)
काणकोण पोलिसांनी आज एका 25 वर्षीय तरुणाला बलात्काराच्या तक्रारीवरून अटक केली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रवीण गावकर याने आपल्यावर काणकोण येथे गेल्या तीन महिन्यांपासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.तसेच गावकरने तिच्या संमतीशिवाय तिचे फोटो क्लिक केले आणि बनावट ओळख वापरून पोलीस असल्याचे दाखवून तिला ब्लॅकमेल केले.
आरोपीवर सध्या भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 अंतर्गत अटक करण्यात आली.तसेच खोटे आयडी तयार केल्याबद्दल कलम 506 (धमकी देणे), 468 (फसवणूक) आणि 170 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी सांगितले की आरोपी आणि इतर दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
काणकोण येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेला धमकावत ब्लॅकमेल केले असून लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार दिनांक 19 सप्टेंबर रोजी काणकोण पोलिसात केली आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार काणकोण येथील प्रवीण गावकर या आरोपीने पीएसआय असल्याचा बनाव केला.
पीडितेशी संबंध प्रस्थापित केले व कालांतराने तिच्या संमतीशिवाय एका खोलीत घेऊन जात अश्लील चित्रफित दाखवली व लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. यावेळी आरोपीने आपले विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले व त्याचा वापर करत आपल्याला ब्लॅकमेल केले. त्यानंतर अनेक वेळा माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.