काणकोणमध्ये पोर्तुगीजकालीन इमारतींची पडझड

काही धोकादायक इमारती चावडी-पणसुले रस्त्याजवळ असून या इमारतीखाली काहीजण व्यवसाय करत आहेत.
Canacona Portuguese Buildings
Canacona Portuguese Buildings Dainik Gomantak

काणकोण : काणकोण पालिका क्षेत्रातील पोर्तुगीजकालीन इमारती कोसळू लागल्या आहेत. यापैकी काही इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. चावडी येथील एक दोनशे वर्षे जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला. या इमारतीत उपाहारगृह चालविण्यात येत होते.

चावडी येथे पाच सहा इमारती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी चावडी येथील शंकर नाईक यांनी पालिका प्रशासनाला त्यासंबंधी माहिती देऊन या धोकादायक इमारतीसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. तत्कालीन मुख्याधिकारी सुदिन नातू यांनी या धोकादायक इमारतींची पाहणी करून या इमारतीच्या मूळमालकांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही.

Canacona Portuguese Buildings
बांधकाम नियमितीकरणाचे 90 टक्के अर्ज निर्णयाविना

काही धोकादायक इमारती चावडी-पणसुले रस्त्याजवळ असून या इमारतीखाली काहीजण व्यवसाय करत आहेत. या इमारती कोसळल्यास रस्त्यावरून जाणारे पादचारी, वाहनचालक त्याचप्रमाणे येथील विक्रेते व ग्राहक यांना धोका संभवतो, असे येथील रहिवासी शंकर नाईक यांनी सांगितले. या धोकादायक इमारतींची पालिकेने तातडीने पाहणी करून योग्य निर्णय घेण्याची मागणी शंकर नाईक यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com