Canacona: खोला मिर्चीचे दर हजारीपार

Canacona The price of Khola Chili is 1200 Rs
Canacona The price of Khola Chili is 1200 Rs

काणकोण: यंदा करोनाने(Corona) जीवन कडू केले आहे मिरची महाग झाल्याने ते तिखट बनले आहे.कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिर्चीचे भाव वाढले आहे. या पूर्वी खोला(काणकोण)(Canacona) मिर्ची तिखट बनली होती. सद्या खोला मिर्चीचे दर बाराशे रूपये प्रति किलो आहेत. खोला मिर्चीला(Khola Chili) भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे मात्र गेल्या पावसाळ्यात खराब हवामानामुळे मिरची पीक कमी आले. शेतकऱ्याच्या हाती तीस टक्क्यापेक्षा कमी पीक हाती लागले.त्यामुळे मिर्ची(Chili) उत्पादन घटल्याने बाजारात(Market) मिर्चीची उपलब्धता नाही.(Canacona The price of Khola Chili is 1200 Rs)

खोला मिरचीला पर्याय म्हणून स्वयंपाकात पोरसाच्या मिरचीचा वापर करण्यात येतो. या पिकालाही खराब हवामानाचा फटका बसला. त्यामुळे यंदा पोरसाच्या मिरचीचे दर खोला मिरची प्रमाणेच दुप्पटीने वाढले आहेत. पूर्वी चारशे ते साडेचारशे रुपये प्रतिकिलो दराने ही मिरची उपलब्ध होत होती तिचे दर आता आठशे ते साडे आठशे प्रति किलो झाला आहे.

खोला मिरचीची साल पातळ व बिया कमी असतात त्याची चव अन्य मिरचीपेक्षा वेगळी असते त्यामानाने पोरसाच्या मिरचीचे साल जाड व बिया जास्त असतात. चवतही फरक असतो. खोला मिरचीचे पीक खोला, श्रीस्थळ, गावडोंगरी,पैगीण व खोतीगाव पंचायत क्षेत्रात घेतले जाते.पावसाळ्यात वनखात्याकडे संघर्ष करीत ही मिरची शेती कुमेरी पद्धतीने केली जाते. काही भागात कोमुनिदाद मालकीच्या जागेत ही शेती केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com