Garbage Problem
Garbage Problem Dainik Gomantak

Goa Panchayat: सांताक्रुझ पंचायतीत कचऱ्याचा मुद्यावर उमेदवार लढवणार निवडणूक

मक्तेदारी मोडण्‍यास मतदार तयार

पणजी: सांताक्रुझ पंचायतीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जटील बनलेली कचरा समस्याच्या मुद्यावर ही निवडणूक उमेदवार लढवत आहेत. पंचायतीच्या वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत कचऱ्याचा मुद्दा उपस्थित होत आला आहे. मात्र आजपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या निवडणुकीतही नवोदित उमेदवार ही समस्या धसास लावतील अशा अपेक्षेने मतदार उद्या मतदानाला सामोरे जाणार आहेत.

(candidate will contest election on issue of garbage in Santacruz Panchayat)

Garbage Problem
मतदारसंघांतील मंत्र्यांची तटस्थ भूमिका! पाच मंत्र्यांच्या बालेकिल्ल्याकडे लक्ष

गेली अनेक वर्षे काही उमेदवारांची असलेली मक्तेदारी यावेळी मतदारांनी मोडून काढण्याची तयारी केली आहे. यावेळी पंचायत निवडणुकीमध्ये आजी-माजी पंचसदस्य निवडणुकीत उभे राहिले आहेत. वेळोवेळी ग्रामसभेत कचऱ्याचा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित करूनही आतापर्यंतच्या पंचायत मंडळाना तो सोडवणे शक्य झालेले नाही. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांनी अनेक आमिषे दाखवली असली तरी यावेळी मतदार त्यांच्या या आश्‍वासनांना कितपत पाठिंबा देतात हे या पंचायतीमध्ये होणाऱ्या मतदानावरून दिसून येणार आहे.

काल प्रचार संपला तरी आज दिवसभर काही उमेदवार निश्‍चित मते मिळण्याची शक्यता आहे त्या भागात फिरत होते. काहींनी प्रभागातील राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. ही निवडणूक सर्व उमेदवारांसाठी अटतटीची होणार हे स्पष्ट आहे.

एनजीओ गट सज्ज

या निवडणुकीत सांताक्रुझ मतदारसंघातील अनेक प्रश्‍न घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या एनजीओचा गट रिंगणात उतरला आहे. तर, माजी सरपंच मारियान आरावजो व माजी सरंपच विलियम्‍स फर्नांडिस तसेच इतर काही माजी पंचसदस्य आपले भवितव्य आजमावत आहेत. आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com