साखळीत 1.60 लाखांचा गांजा जप्त  एकास अटक

 Cannabis worth Rs 160 lakh seized at Sakhali
Cannabis worth Rs 160 lakh seized at Sakhali

डिचोली:  अंमली पदार्थ विरोधात डिचोली पोलिसांनी साखळी येथे छापा मारून राज्याबाहेरील एका युवकाला गांजासह रंगेहाथ पकडले. मूळ उत्तरप्रदेश येथील बलवीर विश्राम चव्हाण (सध्या रा. हावजिंग बोर्ड, साखळी) या  संशयित युवकाकडून पोलिसांनी  सुमारे 1.60 लाख किमतीचा 803 ग्रेम गांजा जप्त केला. संशयिताला अटक करून पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे.

 
साखळी येथे रवींद्र भवन परिसरात गांजा विकण्यासाठी संशयित बलवीर येणार असल्याची माहिती मिळताच डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक गुरूदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर, गौरव वायंगणकर, देवराय कारबोटकर, रणधीर बाले, रोहन गावस या  पोलिस पथकाने सापळा रचून काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत  गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपेश शेटकर पुढील तपास करीत आहेत 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com