Goa Accident News : रायबंदर येथे कार आणि दुचाकीचा अपघात; वाहनचालक जखमी

पोलिस घटनास्थळी दाखल
Car Accident At ribandar
Car Accident At ribandarDainik Gomantak

विविध कारणांमुळे राज्यात अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या चार महिन्यांत एकूण 982 अपघात झाले. त्यात 127 जणांचा अपघातात मृत्यु झाला. 2022 साली झालेल्या अपघातात 80 जणांचा मृत्यु झाला होता.

साधारणपणे दर दिवसाला एक ते दोन व्यक्तींचा वाहन अपघातात मृत्यु होत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवरील सहप्रवाशांच्या मृत्युमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Car Accident At ribandar
Sanquelim-Ponda Municipal Council : साखळी नगराध्‍यक्षपदी रश्मी देसाई बिनविरोध; उपनगराध्यक्ष आनंद काणेकर

दरम्यान आज रायबंदर येथे एका कारच्या अपघाताची घटना समोर आली आहे. कारने दुचाकीला धडक दिल्याने कार रस्त्याच्या बाजूला कलंडली. या अपघात वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे.

पणजीहून जाणारी कार रायबंदर येथे आली असता कारची दुचाकीला धडक बसली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला कलंडली. अपघाता वाहन चालक किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने बराच काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com