सांकवाळ अपघातात कारचा चेंदामेंदा

या भयानक अपघातातून कारचालक सुखरूप बचावला, मात्र गाडीचा चेंदामेंदा झाला.
सांकवाळ अपघातात कारचा चेंदामेंदा
Accident In VascoDainik Gomantak

वास्को: सांकवाळ, झुवारीनगर, बिर्ला राष्ट्रीय महामार्गावर एका इनोव्‍हा कारचालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने त्‍याने रस्‍त्‍यालगतच्‍या वीजखांबाला जोरदार धडक दिली. या भयानक अपघातातून कारचालक सुखरूप बचावला, मात्र गाडीचा चेंदामेंदा झाला.

(Car crash in Vasco accident)

Accident In Vasco
मुलीचे अपहरण केल्‍याप्रकरणी नेपाळच्या युवकाला अटक

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी दुपारी हा अपघात घडला. इनोव्‍हा कार विमानतळमार्गे वेर्णाच्‍या दिशेने जात होती. झुवारीनगर येथे पोचली असता कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने सरळ दुभाजकामध्ये असलेल्या वीजखांबाला जोरदार धडक दिली. या धडकेत वीजखांब व कार रस्त्यावर आडवी झाली.

सुदैवाने यात कारचालकाचा जीव वाचला. पावसामुळे निसरडा झालेल्‍या रस्‍त्‍यामुळे हा अपघात घडल्‍याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास सुरू आहे. दरम्‍यान, या मार्गावर अलीकडे अपघात वाढल्‍याने चिंता व्‍यक्त करण्‍यात येत आहे. त्‍यासाठी वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी मागणी हो लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com