कर्नाटकच्या गाडीला प्रियोळात अपघात

फर्मागुढी ते पणजी महामार्गावर वेलिंग प्रियोळ साकवाजवळ गोवादर्शनासाठी आलेल्या पर्यटकांचा कारवरील ताबा सुटल्यामुळे झाला अपघात
कर्नाटकच्या गाडीला प्रियोळात अपघात

car from Karnataka accident in goa

Dainik Gomantak

मडकई: फर्मागुढी ते पणजी (Panaji) महामार्गावर वेलिंग प्रियोळ साकवाजवळ गोवादर्शनासाठी (Goa) आलेल्या कर्नाटक राज्यातील एका कार गाडीला अपघात (accident) होऊन आतील लहान मुलांसह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. कारचे चाक पंक्चर झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>car from Karnataka accident in goa</p></div>
गोव्याची आत्मग्लानी कधी सरणार?

अपघात झाल्यानंतर लगतच्या लोकांनी तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी थांबवून मदतकार्य केले. हा अपघात शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजण्‍याच्या सुमारास (केए 01 एम 6864) झाला. वेलिंग साकवाजवळील वळणावर हा अपघात झाला. अपघातात कारगाडीचे मोठे नुकसान झाले. वाहनाचा ताबा सुटून रस्त्याच्या डोंगरकडेला आदळली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. जखमींना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सुदैवाने किरकोळ जखमांमुळे त्यांच्यावर उपचार करून जाऊ देण्यात आले.

<div class="paragraphs"><p>car from Karnataka accident in goa</p></div>
Haryana: भिवानीमध्ये भीषण अपघात! खाण परिसरात डोंगर कोसळल्याने 10 ते 15 जण बेपत्ता

गुरुवारी बाणस्तारी येथे अशाच एका पर्यटक वाहनाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला वाहनाने ठोकर दिली होती. सुदैवाने वाहनाचे किरकोळ नुकसान झाले व आतील प्रवासीही बचावले होते. नववर्ष साजरे (New Year) करण्यासाठी इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात वाहने गोव्यात (Goa) आली असून त्यांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने असे अपघात होतात, असे पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.