ATM Theft : फोंड्यातील एटीएम चोरीसाठी वापरलेली कार पोलिसांनी शोधून काढली

फोंडा पोलीस एटीएम लुटीच्या घटनेपासून कारसह चोरट्यांच्या मागावर होते.
ATM Theft | Car Spotted in Fatorda
ATM Theft | Car Spotted in FatordaDainik Gomantak

ATM Theft : फोंड्यात बुधवारी रात्री झालेल्या चोरीच्या घटनांनी संपूर्ण गोवा हादरलेलं असतानाच पोलिसांना तपासात यश आलं आहे. फोंड्यात उसगाव तिस्क परिसरात चोरट्यांनी एटीएम लुटीसाठी वापरलेली कार पोलिसांनी शोधून काढली आहे. फातोर्ड्यातील वेस्टर्न बायपासवर गांधी रोडवर ही ओमनी कार पार्क केलेली पोलिसांना आढळून आली आहे.

फोंडा पोलीस एटीएम लुटीच्या घटनेपासून कारसह चोरट्यांच्या मागावर होते. आता या गुन्ह्यासाठी वापरलेली ओमनी कार फातोर्डा मडगाव परिसरात पार्क केलेल्या अवस्थेत आढळली आहे. GA09 A0324 असा नंबर कारवर लिहिलेला असून पेट्रोलिंग करताना फातोर्डा पोलिसांच्या पथकातील रॉबर्ट यांना ही कार आढळून आली. लागलीच त्यांनी याची माहिती फातोर्डा पोलीस स्टेशनला दिली. फोंडा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याठिकाणी पाचारण करण्यात आलं. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झालं असून या कारची कसून तपासणी केली जात आहे.

ATM Theft | Car Spotted in Fatorda
ATM Robbery : फोडता न आल्यामुळे चोरट्यांनी 2 एटीएम मशीन लांबवली

तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली. दोन्ही एटीएम मधून किती पैसे पळवले ते समजू शकले नाही. पोलिसांनी ही दोन्ही मशीन ताब्यात घेतली असून त्याच्यावरुन हाताचे ठसे किंवा अन्य काही पुरावे मिळतात का याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com