मयडेत कारची वीज खांब आणि पार्क केलेल्या दुचाकीला जोरदार धडक; वीजपुरवठा खंडित

Goa Accident : या धडकेत वीज खांबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खांब मोडला आहे. दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात मोडली गेली आहेत.
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak

गोव्यातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गोवा वाहतूक शाखेतर्फे गोवेकरांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी नियमित प्रयत्न केले जातात. परंतु तरीही अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे.

नुकताच मयडे येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. कारची वीज खांब आणि तिथे पार्क केलेल्या दुचाकीला धडक मागून जोरदार धडक बसली आहे. (car struck power pole and parked two wheeler in moira goa)

Goa Accident
युवकांनी लोककला जपावी: झिलू गावकर

या धडकेत वीज खांबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खांब मोडला आहे. खांब मोडल्याने भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. शिवाय कार आणि पार्क केलेली दुचाकी अशा दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात मोडली गेली आहेत. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र कारचालक नशेत असल्याचा अंदाज भागातील लोकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, डिचोलीत ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक केवळ सुदैवाने बचावला. हा अपघात शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बगलमार्गाला जोडून म्हावळिंगेच्या दिशेने गेलेल्या रस्त्यावरील जंक्शनवर घडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com