मस्ती अंगलट! हणजूण किनारी कार फसली

कारचालकावर गुन्हा दाखल; कारच्या मालकाविरोधात आरटीओकडे अहवाल सादर
मस्ती अंगलट! हणजूण किनारी कार फसली
Car Stucked in Anjuna BeachDainik Gomantak

कळंगुट : हणजूण समुद्र किनाऱ्यावर बेदरकारपणे कार (GA-03-Z/ 8313 ) चालवून इतरांच्या जीवितास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीस्थित ललित कुमार दयाल (मंगोलपुरी नवी- दिल्ली ) च्या विरोधात हणजूण पोलिसांत गुरुवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समुद्रात घुसली.

दरम्यान, संशयित दयाल यांच्या ताब्यातील क्रेटा कार शेट्ये-वाडा, म्हापसा येथील संगीता गवंडळकर यांच्या मालकीची असल्याचे तपासात आढळले. तथापि, खासगी कार दिल्लीच्या पर्यटकांना उपलब्ध करून देणाऱ्या वाहन मालकाविरोधात कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसात गोवा पोलिसांनी बेशिस्त पर्यटकांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे.

Car Stucked in Anjuna Beach
म्हापसा कोर्ट जंक्शनवरील सिग्नल नव्हे ‘डोकेदुखी’

आरटीओ विभागाकडे संबंधित कारमालचाविरोधात अहवाल पाठवण्यात आला आहे. तर कारचालक पर्यटकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे बेशिस्त वर्तन करुन इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलिस निरीक्षक विक्रम नाईक पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com