सांगेच्या नगराध्यक्षपदी केरोज क्रूज

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

केरोज क्रूज हे सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून यापूर्वी त्यांनी उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता.

सांगे

सांगे नगरपालिकेचे नगराध्यक्ष रूमाल्डो फर्नांडिस यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी एकमेव अर्ज आल्याने सांगेच्या नगराध्यक्षपदी केरोज क्रूज यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यंनी घोषित केले. गत महिनाभर नगराध्यक्षपद रिक्त होते.
केरोज क्रूज हे सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून यापूर्वी त्यांनी उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. आता दुसऱ्यांदा त्यांना सांगेचे नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी प्राप्त झाली आहे. आगामी पालिका निवडणुकीला केवळ पाच महिने शिल्लक आहे. त्यात पावसाळा आणि कोरोनाचे सावट असल्याने पाच महिन्यात आपली जबाबदारी पणाला लावून त्यांना सांगेची विकासकामे आणि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आताचे नगराध्यक्षपद हे पाच महिन्यांसाठी असले तरी देशात आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पालिका निवडणूक वेळेवर होईल याची खात्री कोणी देऊ शकणार नसल्याने केरोज क्रूज यांच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या