
फातोर्डा: निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चिंचणी येथील बेनी परेरा या वाहनचालकाविरुद्ध मडगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघाताचे प्रकरण दोन ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजता नावेली जंकशन जवळ घडले होते. आणि जॉकी रॉड्रिगीस (72) वर्षे व लीना
(Case against the taxi driver who caused Naveli accident in goa)
रॉड्रिगीस (74) वर्षे हे दापंत्य या अपघातात बळी पडले होते.यावेळी गाडीमध्ये असलेल्या इतरांना दुखापत झाली होती यावेळी ही चारचाकी गाडी दाभोली विमानतळावरून करमणे या ठिकाणी जात होती हे वाहन नावेली जंकशन या ठिकाणी पोचले असता
वाहनचालकाला डुलकी लागली आणि वाहनाने प्रथम दुभाजकाला धडक दिली व नंतर एका भिंतीला याच वेळी वृद्ध दापंत्या मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणी वाहनचालकावर भा द स 279, 304 अ , 337, 338 कलम अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. सध्या हा वाहनचालक मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.