गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

case for Twelve MLAs from Goa disqualification matter  to be heard in the Supreme Court tomorrow
case for Twelve MLAs from Goa disqualification matter to be heard in the Supreme Court tomorrow

पणजी : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या दहा व मगोच्या दोन आमदारांविरोधात आमदार अपात्रतेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवरील लवकरात लवकर सुनावणी घेण्याचा आदेश गोवा विधानसभा सभापतींना देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्या 10 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, राज्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी या याचिकांवरील सुनावणी येत्या 26 फेब्रुवारीला घेण्याचे आदेश दिले आहेत.

गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी 26 फेब्रुवारीला विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर सुनावणी घेणार आहेत. बारा आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींनी सुनावणी लवकर घ्यावी यासाठी काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.कोरोना महामारीचे कारण देत गेल्यावर्षी या दोन्ही अपात्रता याचिकांवर सुनावणी घेण्याचे सभापतींनी पुढे ढकलले होते.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून दोन तर काँग्रेस मधून दहा आमदारांनी आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या कृतीला दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला आहे आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी या आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणाऱ्या याचिका काँग्रेस आणि मगोकडून सभापती समोर सादर करण्यात आलेल्या आहेत.मात्र, त्यावर सभापतींनी त्वरित निर्णय न दिल्याने दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणी नऊ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यानच्या काळात सभापतींनीही सुनावणी घेण्याची तयारी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com