Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak

Vishwajeet Rane: करंझोळवासीयांविरुद्धचे खटले लवकर रद्द करावेत; विश्वजीत राणे

विश्वजीत राणे : स्थानिकांच्या सहकार्यानेच वनांचे संरक्षण

पणजी: सत्तरी तालुक्यातील करंझोळ येथील स्थानिकांवर वन विभागाने दाखल केलेले खटले रद्द करावेत, अशी सूचना वनमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रधान मुख्य वन संरक्षकांना केली आहे. त्यामुळे वर्षभरापासून ताणलेले वाद संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असून गावकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

(Cases against Karnjol residents should be quashed at the earliest says Vishwajit Rane)

Vishwajeet Rane
Goa Ganesh Chaturthi: 'चतुर्थीच्‍या' बाजारामुळे फोंड्यात वाहतूक कोंडी

करंझोळ येथील एका महिलेने मे 2021 मध्ये म्हादई अभयारण्यातील काही झाडे तोडली होती. याबाबत परिक्षेत्र वन अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी जाब विचारला असता, गावकऱ्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी गावकऱ्यांना वनाधिकाऱ्यांना ओलिस ठेवले होते. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी प्रभुदेसाई यांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी वन खात्याने स्थानिकांवर आणि प्रभुदेसाई यांच्यावरही खटले दाखल केले होते. हे सर्व खटले रद्द करावेत आणि ही फाईल परवानगीसाठी तातडीने सरकारकडे पाठवावी, अशी विनंती प्रधान मुख्य वन संरक्षक राजीव गुप्ता यांना वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली आहे.

मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, की स्थानिकांच्या सहकार्यानेच वनांचे चांगले संरक्षण होते. वन विभाग आणि स्थानिक यांच्यात सहजीवन असणे अत्यंत गरजेचे आहे, तरच वनांचे संरक्षण होऊ शकते यावर आपला विश्वास असून स्थानिक आणि वन विभागात कोणताही संघर्ष नसावा यासाठीच या खात्याचा मंत्री म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारची परवानगी घेतली जाईल आणि परिक्षेत्र वन अधिकारी व स्थानिकांवरचे खटले मागे घेण्यात येतील.

वन खाते आणि ग्रामस्थांमध्ये काय होते प्रकरण...

गेल्या वर्षी मे महिन्यात करंझोळमधील एका महिलेने जनावरांचा गोठा उभारण्यासाठी म्हादई अभयारण्यातील काही झाडे तोडली होती. ही बाब वन विभागाने गांभीर्याने घेऊन कापलेली ती झाडे जप्त करत संबंधितांवर कारवाई करण्याचे निश्चित केले होते. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी या कृतीच्या निषेधार्थ रस्ता बंद करत परिक्षेत्र वन अधिकाऱ्यासह वन रक्षकांना ओलिस ठेवले होते. या दरम्यान वादावादी होऊन मोठा गोंधळ माजला होता. काही गावकऱ्यांनी वन रक्षकांना मारहाण केल्याचे वन खात्याचे मत होते. यावेळी नारायण प्रभुदेसाई यांनी हवेत गोळीबार केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com