Goa Jungle Juice : दारूभट्ट्यांवरील धडधड थांबली; काजू हंगाम संपला

प्रतिकूल हवामानामुळे डिचोलीत काजू फेणी उत्पादनात वाढ
Goa Jungle Juice
Goa Jungle Juice Tukaram Sawant

Goa Jungle Juice : यंदाचा काजू पिकाचा हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, काजू पिकाच्या हंगामात डिचोलीतील विविध भागांत चालणारा काजूपासून दारू गाळणीचा व्यवसायही बंद झाला आहे.

गेल्या जवळपास तीन महिन्यांहून धडधडणाऱ्या दारूभट्ट्याही आता शांत झाल्या आहेत. प्रतिकूल हवामान त्यातच अवकाळी पावसानेही कृपा केल्याने यंदा काजू व्यवसायाचा मोसम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. यंदा काजू आणि दारू उत्पादनात वाढ झाल्याची माहिती बागायतदार व दारू उत्पादकांकडून मिळाली आहे.

Goa Jungle Juice
सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर... म्हाऊस गावात पाण्याविणा नागरिकांचे हाल; मोर्चा काढण्याचा दिला इशारा

डिचोली तालुक्यातील विविध भागांत काजू बोंडूपासून हुर्राक, काजू फेणीचे उत्पादन घेण्यात येते. डिचोलीतील काही दारू उत्पादक व्यावसायिक स्थानिक बागायतींमधून उपलब्ध होणाऱ्या काजूबोंडूसह महाराष्ट्रातील वझरे, माटणे, दोडामार्ग आदी भागातून काजूबोंडूंची आयात करून दारू गाळतात. डिचोलीत दरवर्षी काजू फेणीचे उत्पादन होते, त्यात 50 टक्क्यांहून अधिक उत्पादन हे राज्याबाहेरील काजूबोंडूंपासून होते.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा काजूपिकाबरोबरच ‘फेणी’ उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसे संकेतही बहुतेक व्यावसायिकांकडून मिळाले आहेत.

Goa Jungle Juice
Goa Police : राज्यातील 22 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

दारू गाळणी बंद

काजू पिकाच्या हंगामात तालुक्यातील सर्वण, मये, कारापूर, नार्वे, धुमासे, कुडचिरे, उसप आदी भागांत काजू बोंडूंपासून दारू गाळणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. साधारण तीन महिने दारूभट्ट्या पेटतात.

आता काजू हंगाम संपुष्टात आल्याने दारू गाळणीचा व्यवसाय बंद झाला असून, दारूभट्ट्यांची आगही विझली आहे. पावसाळा जवळ आल्याने काही व्यावसायिकांनी दारूभट्ट्यांवरील ‘भाण’ आदी यंत्रसामग्री काढून ती व्यवस्थित ठेवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

"गेल्या जवळपास दहा-बारा वर्षांनंतर यंदा काजू हंगामाचे पूर्ण दिवस व्यवसाय चालला. यंदा काजू पीक समाधानकारक आले. त्यातच अवकाळी पावसानेही फटका दिला नाही. राज्याबाहेरूनही काजूबोंडूंची आवक वाढली. त्यामुळे काजू आणि दारू उत्पादनात समाधानकारक वाढ झाली आहे."

उमेश सावंत आणि सोनू सावंत, दारू उत्पादक, सर्वण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com