कसिनो कर्मचाऱ्यांची आरोग्य केंद्राबाहेर गर्दी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

महिन्याच्या सुरवातीला कसिनो व्यवसाय सुरू झाला आहे. त्या कसिनोत काम करणारे आणि टाळेबंदीमुळे घरी परतलेला परराज्यातील कामगारवर्ग आता पुन्हा गोव्यात परतू लागला आहे. कसिनो व्यवस्थापन कंपन्यांनी आलेल्या कामगारांना कोरोना चाचणी घेण्यास सांगितले आहे.

पणजी: महिन्याच्या सुरवातीला कसिनो व्यवसाय सुरू झाला आहे. त्या कसिनोत काम करणारे आणि टाळेबंदीमुळे घरी परतलेला परराज्यातील कामगारवर्ग आता पुन्हा गोव्यात परतू लागला आहे. कसिनो व्यवस्थापन कंपन्यांनी आलेल्या कामगारांना कोरोना चाचणी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे येथील शहरी आरोग्य केंद्रात (अर्बन हेल्थ सेंटर) आज सकाळी कसिनोतील कर्मचाऱ्यांनी फॉर्म मिळविण्यासाठी गर्दी केली होती. 

राज्याच्या पर्यटनाचा अविभाज्य भाग बनलेल्या कसिनो उद्योगात परराज्यातील हजारो कर्मचारी काम करतात. याशिवाय या व्यवसायावर स्थानिकांचे अनेक व्यवसायही अवलंबून आहेत. कसिनो १ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर परराज्यातील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने पाचारण केले आहे. सध्या हळूहळू कर्मचारी राज्यात परतू लागले असून, काही कसिनोंच्या व्यवस्थापनाने दक्षतेचा उपाय म्हणून गोव्यात दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्यास सुरुवात केली आहे. 

शहरातील आरोग्य केंद्रात आज सकाळपासून कसिनो कर्मचाऱ्यांरी कंपनीचे पत्र घेऊन रांगा लावून उभे होते. आरोग्य तपासणीसाठी भरावयाचा अर्ज घेण्याकरिता रांगा लावून उभे राहिलेल्यांमध्ये आसाम, बंगाल, उत्तराखंड येथील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या