Cat Sanctuary in Goa: गोव्यातील 120 मांजरांची सेवा करणारी सोनिया स्मार्ट

Cat Sanctuary in Goa Sonia Smart serving 120 cats in Goa
Cat Sanctuary in Goa Sonia Smart serving 120 cats in Goa

Goa Cat Sanctuary:गोव्यात राज्यातील जनजिवन सध्या चक्रीवादळामुळे विस्कटले आहे. अजूनही गोव्यातील काही भागातीत विजपुरवठा खंडित आहे तर काही भागात अजूनही इंटरनेट सुविधा बंदच आहे. त्याचबरोबर समुद्राचे पाणी विहिरीत गेल्याने तेथिल लोकांचे पिण्याच्या पाण्याचेही हाल होत आहे. अशातच जनावरांचे काय झाले असेल असा प्रश्न पडला. प्राणांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले असेल असा विचार आमच्या मनात आला. (Cat Sanctuary in Goa Sonia Smart serving 120 cats in Goa)

सोनिया स्मार्ट यांनी गोव्यात कॅटसॅन्च्युरी नावचा एक उपक्रम सुरु केला ज्यात त्या तब्बल 120 मांजरांचा सांभाळ करतात. गोव्यातील अपंग, पॅरॅलाइज, आंधळ्या, आणि रस्त्यावर टाकून दिलेल्या मांजरांच संगोपन त्या करत आहेत. मात्र सध्या गोव्यात आलेल्या वादळामुळे त्याच्या या उपक्रमालाही फटका बसला आहे. त्याच्या या उपक्रमाचे नाव कॅटसॅन्च्युरी आहे. मांजरांना जेवण आणि पौष्टिक पदार्थ खावू घातले जातात. त्यांच्या आरोग्याची ही काळजी घेतली जाते. हे पाळीव प्राणी कॅटसॅन्च्युरी कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना सुरक्षित, निरोगी आणि प्रेमळ वातावरण देण्याचा पुरेपुर प्रयत्न सोनिया स्मार्ट करत आहेत.

त्यांच्याकडे अगदी छोट्या मांजरांपासून ते मोठ्या मांजरांपर्यंत तब्बल 120 मांजरी आहे. या कॅटसॅन्च्युरीतील मांजरांच्या सोनिया आईच आहेत अस म्हणायला हरकत नाही. बऱ्याच लहान प्राण्यांना त्यांनी आपल्या कॅटसॅन्च्युरी मध्ये आसरा दिला आहे. या महागाइच्या जगात कुणी एका व्यक्तीला देखिल आसरा देतांना विचार करतात. पण त्यांनी या मांजरांना आधार दिलाय त्यांना जगवण्यासाठी त्यांची धडपड अगदी आईसारखीच सुरू आहे. पण आता त्यांना आपल्या या कुटुंबाला जगविण्यासाठी मदतीचा हात हवाय. या मांजरांचे पालन पोषण करण्यासाठी त्यांना सपोर्ट सोशल मिडियाकडून मिळतो. त्यांनी कॅटसॅन्च्युरी नावाचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजही क्रिएट केले आहे. त्यांच्या या प्रांण्यांचे खाणे पिणे घराचा रेंट देणे हे सगळ त्या सांभाळत आहेत. पण गोव्यात आलेल्या वादळामुळे आता अवघड जात असल्याने त्यांनी प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या लोकांकडे मदतीचा हात मागितला आहे.

त्यांच्या या कुटूंबात वयवर्ष 1 महिन्यापासून ते 5 वर्षांपर्यंतच्या मांजरी आहेत. या कॅटसॅन्च्युरीमध्ये बहिऱ्या, 2 अंध, मांजरी, 4 अंपंग म्हणजे तीन पायांच्या मांजरी आहेत. आणि दोन  2 कुत्री आहेत. रस्त्यावर टाकून दिलेल्या मांजरांचा सांभाळ कॅटसॅन्च्युरीमध्ये केला जातो. या ठीकाणी मांजरांचा बचाव केला जातो. त्यांना जगण्यासाठी एक सुरक्षीत ठिकाण उपलब्ध करून दिले गेले आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना ज्या मांजरी सापडतात त्यांचे संगोपन कॅटसॅन्च्युरीमध्ये केले जाते. एकूण 120 मांजरी आणि 40 पिल्लांच संगोपन या कॅटसॅन्च्युरीमध्ये केल जात आहे. 30 ते 35 लोकांचं नेटवर्क या कॅटसॅन्च्युरीच्या माध्यमातून निर्माण झालं आहे. या नेटवर्क मध्ये सगळे प्राणी प्रेमी आहेत ज्यांना मांजरी आवडतात अशा लोकांचाच समावेश आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यत अनेक मांजरांचे प्राण वाचविले आहे. त्यांच्या पैकी अनेक लोक असे आहेत जे मार्केट प्लेसमध्ये जावून मांजरांचा शोध घेतात. त्यांना घरी आणतात आणि त्यांचं संगोपन करतात. मार्केटमध्ये फिरणाऱ्या प्राण्यांना खायला अन्न मिळून जात पण ज्या मांजरांना खायला अन्न निळत नाही त्यांना कॅटसॅन्च्युरीच्या माध्यमातून खाण्याच्या वस्तू पुरविल्या जातात. आता या मांजरांना लोकोनी दत्तक घ्यावं, त्यांची 15 ते 16 वर्ष काळजी घेतली पाहिजे अशी इंच्छा सोनिया स्मार्ट यांनी व्यक्त केली आहे. जेणेकरून त्यांच्या या उपक्रमाला थोडा आदार होईल. ही कॅटसॅन्च्युरी गोव्यातील कोलावळ भागात आहे. या कॅटसॅन्च्युरीच्या NGO रजिस्ट्रेशनचे काम लवकरच आम्ही करू असे सोनिया स्मार्ट  यांनी सागितले. 

मला मांजरी आवडतात म्हणून मी हा माझा स्वतंत्र्य उपक्रम आवड म्हणून सुरू केला होता. आणि मला या उपक्रमात माझी आई सपोर्ट करत आहे जिचे वय आता 85 वर्ष आहे. माझी मुलगी जी 19 वर्षाची आहे. आणि माझा पुर्ण स्टाफ या कॅटसॅन्च्युरी मध्ये सहभागी आहे. आम्ही गोव्यातील एका जुन्या गोवन हाउस मध्ये राहतो जिथे 2 गार्डन्स आहेत. त्यामुळे या मांजरांना खेळायला भरपूर जागा आहे. आमच्याकडे 120 मांजरी आणि 2 कुत्रे आहेत. स्थानिक बाजारात मला दररोज मांजरी दिसतात. चौकशी केल्यावर मला कळले की बर्‍याच स्थानिक बाजारपेठामध्ये लोकं माजरी आणून टाकतात. त्यामुळे मला हे लक्षात आले की कुत्र्यांमुळे या मांजरी मार्केटप्लेसमध्ये असुरक्षित आहेत. म्हणून मी त्यांना घरी घेवून आले. गोव्यात बचावकर्त्यांमध्ये आमचे नेटवर्किंग अधिक चांगले झाले आहे. म्हणून आम्ही अशा प्राण्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे करू शकतो. मांजरांसाठी एक अभयारण्य तयार करण्याचे माझे स्वप्न आहे.

-Sonia Smart


समाजात भटक्या मांजरींना खायला द्या : त्यांचे संगोपन करा
त्यांना दत्तक घ्या मांजरीचे पिल्लू वाढवा त्याची काळजी घ्या सुरक्षित, प्रेमळ आणि काळजी घेणारे घर आणि चांगले आरोग्य द्या, आणि मांजरींचे संगोपन करण्यासाठी आमची मदत करा. असे आवाहन त्यानी लोकांना केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com