म्हापशातील मुख्य रस्त्यावरील गुरांमुळे वाहतुकीत व्यत्यय

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

म्हापसा शहरातील वहुतांश मुख्य रस्त्यांवर गुरांमुळे वाहतुकीत सध्या व्यत्यय येत असतो. ही गुरे दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्यावेळीसुद्धा रस्त्यांवर ठाण मारून बसलेली असतात.

म्हापसा:  म्हापसा शहरातील वहुतांश मुख्य रस्त्यांवर गुरांमुळे वाहतुकीत सध्या व्यत्यय येत असतो. ही गुरे दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्यावेळीसुद्धा रस्त्यांवर ठाण मारून बसलेली असतात.

गुरांचे कळप रस्त्यांवर असल्याने लोकांना स्वत:ची वाहने सावकाश चालवत त्यांच्यामधून वाट शोधत मार्गक्रमण करावे लागते. तसेच, गुरांच्या मलमूत्रामुळे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामांत आणखीन भर पडत असते. गुरांचे मालक त्यांना मोकाटच सोडत असल्याने शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास होत आहे. त्याशिवाय, बऱ्याचदा ती गुरे बाजारपेठेत घुसून भाजीपाला, फळे इत्यादी मालावर ताव मारत असतात. त्यामुळे विक्रेत्यांनाही आर्थिक नुकसान होत असते.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी म्हापसा पालिकेने अशा मोकाट गुरांसंदर्भात कारवाई करण्याच्या हेतूने सिकेरी मये येथील गोशाळेत त्या गुरांची रवानगी करणे सुरू केले होते. परंतु, एक-दोन खेपा झाल्यानंतर ती कारवाई लगेच थांबली. 

त्यामुळेच सध्या म्हापसा शहरात मोकाट गुरांचा प्रश्न प्रकर्षाने भेडसावत आहे. 

संबंधित बातम्या

Tags