Sonali Phogat Case: सोनाली फोगट हत्येप्रकरणी CBI ने दाखल केले आरोपपत्र

CBI Enquiry: टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
Sonali Phogat Case | CBI Enquiry
Sonali Phogat Case | CBI EnquiryDainik Gomantak

Sonali Phogat Case: टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गोव्यातील कर्लीज बारमध्ये सोनाली फोगट यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सोनाली यांच्या हत्येचा आरोप सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर ठेवण्यात आला होता. सोनाली यांना जबरदस्तीने अमली पदार्थ सेवन करण्यास भाग पाडून मारल्याचा आरोप दोघांवर होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटकही केली होती. आज सीबीआयने कोर्टात आरोपपत्र सादर केले.

दरम्यान, या प्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) पहिल्यांदा तपास केला होता, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सोनाली फोगट यांचा मृत्यू 22-23 ऑगस्टच्या रात्री झाला होता. त्यानंतर सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सुधीर सांगवानसह 5 आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचा आणि कट रचल्याचा आरोप होता. गोवा सरकारने सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीची शिफारस केली होती. यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला होता.

गोव्यापासून हरियाणापर्यंत तपास करण्यात आला

सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलीस आणि सीबीआय या दोघांनी गोव्यापासून (Goa) हरियाणातील हिस्सार, रोहतक आणि गुरुग्रामपर्यंत तपास केला होता. सुधीर सांगवान याच्यावर सोनाली यांची बहीण आणि कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com