ताळगावातील जमीन व्यवहारांची सीबीआय चौकशी करा

ताळगावातील जमीन व्यवहारांची सीबीआय चौकशी करा

पणजी,

ताळगावातील आत्तापर्यंत झालेल्या जमीन व्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय)  चौकशी करावी. पंचायत घरासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीविषयीची कोणतीही कागदपत्रे सरपंच दाखवू शकले नाहीत. त्यामुळे हे काम पूर्णपणे बेकायदेशीररित्या सुरू आहे. त्याबाबत आम्ही दिवाणी न्यायालयात दाद मागणार असून, कोमुनिदादच्यामार्फत उच्च न्यायालयात त्याविरुद्ध दावा दाखल केला जाणार असल्याची माहिती आज ताळगावातील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली. 
या परिषदेस ॲड. पुंडलिक रायकर, सिसीली फर्नांडिस, ताळगाव कोमुनिदादचे झेव्हियर आल्मेदा, माजी पंचसदस्य कँडितो डायस, पिडीत शेतकरी रॉबर्ट फाल्काव, कामेलो फर्नांडिस व इतर ग्रामस्थांची उपस्थित होती. 
याप्रसंगी ॲड. रायकर म्हणाले की, ताळगाव पंचायत घरासाठी जागेवर जेव्हा माती आणून टाकली जात होती, तेव्हा आम्ही ग्रामस्थ म्हणून त्यास विरोध केला होता. परंतु पोलिसांचा वापर करून आम्हाला अटक केली आणि सात ते आठ तासांनी आम्हाला सोडले. सरपंचांनी जी पत्रकार परिषद घेऊन आपणाकडे जमिनीचे कागदपत्रे घेतल्याचा दावा केला आहे, तर मग सरपंच आम्हाला कागदपत्रे का दाखवित नाही. सरकार दप्तरी जी कागदपत्रे सादर झाली आहेत, त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या बोगस सह्या आहेत. त्याविषयी आम्ही फॉरेन्सिक लॅबकडे त्या सह्या तपासणीसाठी पाठवविल्या आहेत. २००४ मध्ये तत्कालीन सरपंच जानू रोझारिओ याच्या काळात तीन ग्रामसभांमध्ये ठरराव झाले. त्या ठररावात पंचायत क्षेत्रातील जमीन विकासकामाठी न घेणयाचा निर्णय झाला होता. 
आंदोलनावेळी आम्ही आंदोलकांना कागदपत्रे न दाखवता वैयक्तिकरित्या जे आरोप सरपचांनी केले आहेत, त्याविरुद्ध रायकर यांनी नाराजी व्यक्त केली. २००६ पासून ते आजतागायत ताळगाव प्रत्यक्षात बेकायदेशीर व्यवहार झालेले आहेत. आत्तापर्यंत या ठिकाणी प्रथम कामे केली जातात आणि नंतर ती जागा किंवा जमीन ताब्यात घेतली जाते, असे प्रकार घडले आहेत. सरपंच जानू यांनी पंचायत शेतजमीन अधिग्रहीत करणार नसल्याचे सांगितले होते, याची आठवण याप्रसंगी रायकर यांनी करून दिली. शेतकरी कामेलो फर्नांडिस यांनी सांगितले की आपल्या पूर्वजांपासून पंचायतीने ताब्यात घेतलेल्या जागेत शेती करीत होते. आत्तापर्यंत आम्हाला कोणतीही रक्कम मिळालेली नाही. 
-------------------------------------------
--------------------------------------------------
सचिव अनेक वर्षे एकाच ठिकाणी कसा?
पंचायतीने जमिनीचे ताबा प्रमाणपत्र घेतलेले नाही. या जमिनीच्या कागदपत्रांवरील सह्या पूर्णपणे बनावट आहेत आणि हा पूर्णपणे गुन्हा आहे. येथील लोक जमीन ताब्यात घेऊ नका म्हणून सांगतात, तरीही आपल्या सत्तेचा गैरवापर करून त्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. त्याशिवाय ताळगावातील स्थानिकांनी एकत्रित यावे. पंचायतीतील सचिव आत्तापर्यंत एकाच ठिकाणी कसा कार्यरत आहे, असे सवाल सिसीली फर्नांडिस हिने उपस्थि केला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com