Sonali Phogat Case : सोनाली फोगट हत्या प्रकरणाचा तपास आता नव्याने होणार

सोनाली फोगट प्रकरणात सीबीआयने दस्तावेज घेतले ताब्यात; गोव्यात दाखल होताच चौकशी सुरु
Sonali Phogat Murder case
Sonali Phogat Murder caseDainik Gomantak

Sonali Phogat Case : राज्यात खळबळ उडवून दिलेल्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास शुक्रवारी दिल्लीमधील केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सीबीआय पथक काल शुक्रवारी सकाळी गोव्यात दाखल झाले. हणजूण पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व दस्तावेज ताब्यात घेतला असून उद्यापासून या प्रकरणाचा तपास नव्याने सीबीआय करणार आहे.

गोव्यात दाखल झाल्यावर महिला अधिकाऱ्याने गोव्यातील सीबीआय कार्यालयात जाऊन येथील पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर पोलिस मुख्यालयात महासंचालक जसपाल सिंग यांच्याशी चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत प्रकरण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. सीबीआयने नव्याने तक्रार दाखल केल्याने सांगवान व सुखविंदर सिंग यांची न्यायालयाकडून पोलिस कोठडी घेऊन पुन्हा जबान्या नोंदवण्याची शक्यता आहे. हे पथक आज शनिवारी हणजूण येथील कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटचा सील केलेला भाग पाहणी करण्याची शक्यता आहे. तसेच शव चिकित्सा अहवाल सादर केलेल्या फॉरेन्सिक मेडिसिन डॉक्टरांकडून अहवालाबाबत अधिक माहिती घेईल.

Sonali Phogat Murder case
Digambar Kamat : दिगंबर कामतांना मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत जोरदार धक्का

सीबीआयचे अधिकारी हणजूण पोलिस स्थानकातच तपासकाम सुरू करण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी सांगितले, हणजूण पोलिसांनी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ते प्रकरण सीबीआयकडे दिले आहे. ‘संशयित सांगवान व सुखविंदर सिंग या दोघांच्या नोंदविलेल्या जबान्या, काही साक्षीदारांच्या जबान्या, शव चिकित्सा अहवाल हा सर्व दस्तावेज सीबीआयला सुपूर्द केला आहे. मात्र, या प्रकरणाशी संबंधित असलेले ड्रग्ज प्रकरण तपास हणजूण पोलिसच करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com