पणजीत नरकासुराच्या दहनावर असणार पोलिसांचे लक्ष; महापालिकेकडून फटाके न फोडण्याचे आवाहन

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

कॉर्पोरेशन ऑफ पणजीने (सीसीपी) दिवाळी सणानिमित्त फटाके फोडण्यास गेल्या आठवड्यातच बंदी घातली आहे. यात त्यांना पणजी पोलीसांचेही सहकार्य मिळणार आहे .

पणजी- कॉर्पोरेशन ऑफ पणजीने (सीसीपी) दिवाळी सणानिमित्त फटाके फोडण्यास गेल्या आठवड्यातच बंदी घातली आहे. यात त्यांना पणजी पोलीसांचेही सहकार्य मिळणार असून दिवाळीच्या दिवशी नरकासुराच्या दहनासमयी पोलीस शहरात गस्त घालणार आहेत. या महिन्याच्या सुरूवातीस सरकारने दिवाळीच्या दरम्यानच्या काळातील कार्यप्रणाली कशी असावी, याबाबत एक सुचना प्रसिद्ध केली होती. 

'आम्ही शहरातील नरकासूर समित्यांच्या सदस्यांना फटाके फोडू नका असे स्पष्ट सांगितले आहे. त्यांनीही आमचे म्हणणे ऐकून घेतले. शहरातील साऊंड सिस्टीमवरही नियंत्रण ठेवण्याबद्दल पणजीच्या पोलीस निरीक्षकांशी आमचे बोलणे झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही विशिष्ट वेळेत नरकासुराचे दहन करण्यात यावे, अशी सुचना दॆण्यात आली आहे. यामुळे पोलिसांनाही बंदोबस्त करणे सोपे होईल,' असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.        

 सीसीपीने गणेश चतूर्थीच्या दिवशीही फटाके फोडण्यास प्रतिबंध लगावला होता. याशिवाय गणेश विसर्जनाची मिरवणूक आणि त्यावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी नवीन कार्यप्रणाली राबवली होती. मात्र, त्यावेळी शहराच्या बाहेर जात काहींनी नियमांचे उल्लंघन करत विसर्जन मिरवणूक काढल्या होत्या. सोशल डिस्टंसिंगचा त्यावेळी फज्जा उडवण्यात आला होता. त्यामुळेच शहरातील कोरोना रूग्णसंख्या वाढल्याचेही यावेळी महापौर मडकईकरांनी सांगितले.    
 

संबंधित बातम्या