मडगाव शहरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बंद

वार्ताहर
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

मडगाव पालिका क्षेत्रात बेशिस्त वाहतूक व सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, त्या कॅमेऱ्याची देखभाल करण्यासाठी मडगाव पालिका व प्रशासन एकमेकावर जबाबदारी ढकलू लागल्याने शेवटी सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत आहेत.

नावेली:  मडगाव पालिका क्षेत्रात बेशिस्त वाहतूक व सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, त्या कॅमेऱ्याची देखभाल करण्यासाठी मडगाव पालिका व प्रशासन एकमेकावर जबाबदारी ढकलू लागल्याने शेवटी सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत आहेत.

खरे म्हणजे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप फायदा होत असे. 

सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बंद पडल्या नंतर ती पुन्हा सुरू करण्यासाठी वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध  शिरवईकर यांनी मडगाव पालिकेला पत्रव्यवहार करुन सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याची मागणी केली, परंतु अद्यापपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात आलेले नाहीत.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, वाहतूक पोलिस उपअधीक्षक यांच्या संयुक्त बैठकीत अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती संदर्भात विषयावर चर्चा होऊन मडगावपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे देखभाल करण्यासाठी सांगण्यात आले. परंतु पालिकेने आपल्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरे देखभालीची जबाबदारी घेतली नाही.

पाँडेचेरी सारख्या छोट्याशा राज्यातील लोकांनी आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे १०० टक्के लोकांनी आपल्या घरात व खाजगी आस्थापनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने त्यांचा फायदा अनेक गुन्ह्यांचा तपास कार्य करण्यासाठी फायदा होत आहे.

अशाच प्रकारे गोव्यातील लोकांनी आपल्या सुरक्षे संदर्भात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत गरज असल्याचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

मडगावातील उद्योजक व समाजसेवक विवेक नाईक यांनी लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून मडगावातील जनतेच्या सुरक्षितेसाठी संदर्भात शासनकडून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.

 

संबंधित बातम्या